-   राज्यसभेच्या सहाव्या जागेवर निवडूण आलेले भाजपाचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक सध्या चर्चेत आहेत. 
-  धनंजय महाडिक हे भाजपाचे कोल्हापुरातील अनुभवी राजकारणी आहेत. 
-  शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभूत करत विजय मिळवल्यामुळे धनंजय महाडिकांबद्दल चर्चा रंगली आहे. 
-  पण त्यांच्याबरोबरच निवडणुकीपूर्वी ‘डॅडीच जिंकणार’ असा विश्वास असणाऱ्या धनंजय महाडिक यांचा मुलगाही चर्चेत आहे. 
-  धनंजय महाडिक यांना पृथ्वीराज, कृष्णराज आणि विश्वराज ही तीन मुले आहेत. 
-  यातील कृष्णराजने निवडणुकीपूर्वी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत वडीलच जिंकतील असा विश्वास व्यक्त केला होता. 
-  धनंजय महाडिक विजयी झाल्यानंतर विधानभवनाबाहेर कृष्णराज पाणावलेल्या डोळ्यांनी वडिलांसोबत गळाभेट घेताना दिसून आला. 
-  त्यानंतर कृष्णराजबद्दाल समाजमाध्यमांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. 
-  कृष्णराजचा जन्म १२ जून १९८८ रोजी झाला. 
-  कृष्णराज महाडिक हा एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. 
-  लॉकडाऊनमध्ये त्याने ‘क्रिश महाडिक’ नावाचं युट्यूब चॅनेल सुरु केलं. 
-  कृष्णराज सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय असतो. 
-  त्याचे युट्यूबवर २ लाख ३५ हजार तर इन्स्टाग्रामवर १ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. 
-  कृष्णराज चॅनेलवरून गमतीशीर व्हिडीओ पोस्ट करत असतो. 
-  युट्यूबमधून मिळणाऱ्या पैशातून तो समाजकार्य करतो. 
-  कृष्णराजला युट्यूबचे सिल्व्हर बटणदेखील मिळाले आहे. 
-  कृष्णराजचे शिक्षण लंडनमधून झाले असून तो एक ‘फॉर्म्यूला ३’ रेसरसुद्धा आहे. 
-  दहा वर्षाचा असल्यापासूनच त्याला रेसिंगचं वेडं लागलं होतं. 
-  ‘ब्रिटीश फॉर्म्युला ३ चॅम्पियनशिप’ जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे. 
-  कृष्णराज अनेकदा फॅमिली सोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. 
-  (सर्व फोटो : कृष्णराज महाडिक /इन्स्टाग्राम) 
Photos : ‘ब्रिटीश फॉर्म्युला ३ चॅम्पियनशिप’वर नाव कोरणाऱ्या धनंजय महाडिक यांच्या युट्यूबर मुलाबद्दल जाणून घ्या
धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज हा एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे.
Web Title: Bjp dhanjay mahadik son krishnaraaj mahadik is a famous you tuber and formula 3 racer know more about him photos kak