-
‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांच्या गजरामध्ये सिंहगडावर शिवराज्याभिषेक सोहळा रविवारी उत्साहात साजरा झाला. फुलांनी सजविलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुणे दरवाजा येथे शिवप्रेमींनी पुष्पवृष्टीने स्वागत केले.
-
विश्व हिंदू परिषद, पुणे आणि श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समितीच्या (किल्ले सिंहगड) वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
दुपारी बारा वाजता पालखी सोहळ्याचे सिंहगडावर आगमन झाले. गडाचे प्रवेशद्वार आणि बुरुज फुलांनी सजवण्यात आले होते. तर, ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या. तत्पूर्वी छत्रपती राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी फेरीमध्ये दोन हजार शिवप्रेमी भगवे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते.
-
पालखी सोहळ्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्तमंत्री दादा वेदक, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांतमंत्री संजय मुरदाळे, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण उपस्थित होते.
-
सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली.
-
पालखी मिरवणुकीत हलगी पथक, शंखनाद पथक यांसह पारंपरिक पेहरावातील महिला सहभागी झाल्या होत्या. सुरेश मोहिते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले.
Photos: सिंहगडावर शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात, शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर ‘शिवमय’
‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांच्या गजरामध्ये सिंहगडावर शिवराज्याभिषेक सोहळा रविवारी उत्साहात साजरा झाला.
Web Title: Shivrajyabhishek ceremony at singhgad fort photos pune print news rmm