-
सध्या देशात इंधनाचे दर गगनाला भीडत आहेत. सीएनजी गॅसच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. पण पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत सीएनजीवरील कार सर्वसामान्य नागरिकांना परवडत आहेत. या कार ७५ रुपयांच्या इंधनात ३५ किमीपर्यंतचं मायलेज देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया… देशातील पहिल्या पाच सीएनजी कारबाबत…
-
सीएनजी कारच्या बाजारात मारुती सुझुकी इंडियाचं वर्चस्व आहे. यामध्ये मारुती सेलेरियो हे सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. सेलेरियो ही देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी सीएनजी कार आहे. ही कार १ किलो CNG मध्ये ३५.६० किमी मायलेज देते.
-
दिल्लीत सीएनजीचा दर ७५.६१ रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार कंपनीद्वारे सीएनजी किट लावलेली मारुती सेलेरियो कार ७५ रुपयांमध्ये ३५ किमीपर्यंत मायलेज देऊ शकते. या कारची किंमत ६.६९ लाख रुपयांपासून सुरू होते.
-
मारुती सुझुकी कंपनीची मारुती वॅगनआर सीएनजी कार १ किलो CNG मध्ये ३४.०५ किमी मायलेज देते. याची किंमत ६.४२ लाख रुपयांपासून सुरू होते.
-
देशातील सर्वात स्वस्त कार असलेल्या मारुती अल्टो मॉडेलच्या सीएनजी कारची किंमत ५.३० लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार एक किलो सीएनजीमध्ये ते ३१.५९ किमीचं जबरदस्त मायलेज देते. ही कार ८०० सीसी इंजिनसह येते.
-
मारुती कंपनीची अन्य एक मारुती एस-प्रेसो (Maruti-S-Presso) सीएनजी कार मायलेजच्या बाबतीत वरचढ आहे. ही कार एक किलो सीएनजीमध्ये ३१.२ किमी मायलेज देते. याची किंमत ५.३८ लाख रुपयांपासून सुरू होते.
-
टाटा मोटर्सने या वर्षी आपल्या काही CNG कार भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. यातील टाटा टियागो (TATA Tiago) सीएनजी कार मायलेजसाठी अतिशय चांगली मानली जाते. ही कार एक किलो सीएनजीमध्ये २६ किमीपेक्षा अधिकचं मायलेज देते. याची किंमत ६.१० लाख रुपयांपासून सुरू होते. (सर्व फोटो सौजन्य -इंडियन एक्स्प्रेस)
Photos: ७५ रुपयांत मिळेल ३५ किमीचं मायलेज; ‘या’ आहेत भारतातील पहिल्या पाच CNG कार
सध्या देशात इंधनाचे दर गगनाला भीडत आहेत. सीएनजी गॅसच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. पण पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत सीएनजीवरील कार सर्वसामान्य नागरिकांना परवडत आहेत.
Web Title: Top 5 cng cars in india will give 35 km mileage in 1 kg cng rmm