Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is lalit modi dating bollywood actress sushmita sen ipl founder know more about him photos kak

Photos: आयपीएल संस्थापक, फरार आरोपी…सुष्मिता सेन डेट करत असलेल्या ललित मोदींबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत?

Lalit Modi & Sushmita Sen News : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी एकमेकांना डेट करत आहेत.

Updated: July 15, 2022 13:29 IST
Follow Us
  • who is lalit modi dating bollywood actress sushmita sen
    1/21

    लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या समाजमाध्यमांमध्ये रंगल्या आहेत.

  • 2/21

    ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर या चर्चांना उधाण आले.

  • 3/21

    मोदी यांनी स्वत: आम्ही रिलेशनशिपमध्ये असून लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

  • 4/21

    सुष्मिता सेनसोबतचे रोमॅंटिक फोटो पोस्ट केल्यानंतर चर्चेत आलेल्या ललित मोदींबद्दल जाणून घेऊया.

  • 5/21

    ललित मोदी यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९६३ रोजी दिल्ली येथे झाला. ते ५८ वर्षांचे आहेत.

  • 6/21

    २००८ साली सुरू करण्यात आलेल्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग)चे ते संस्थापक आणि पहिले अध्यक्ष होते.

  • 7/21

    व्यावसायिक असेलेले ललित मोदी पेशाने इंजिनिअर आहेत. अमेरिकेतून त्यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे.

  • 8/21

    अमेरिकेतील क्रीडा व्यवसायाने प्रेरित होऊन त्यांनी १९९५ साली पहिल्यांदा ‘इंडियन क्रिकेट लीग लिमिटेड’चा प्रस्ताव बीसीसीआयकडे ठेवला होता.

  • 9/21

    परंतु, बीसीसीआयने त्यांच्या या कल्पनेला फारसं महत्त्व न देता त्याकडे दुर्लक्ष केलं.

  • 10/21

    क्रिकेटवर विशेष प्रेम असलेल्या ललित मोंदींचे राजकारणाशीही संबंध आहेत.

  • 11/21

    भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांशी त्यांची जवळीक आहे.

  • 12/21

    २०१० मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात गैरवर्तन आणि आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी बीसीसीआयकडून त्यांच्यावर २०१३ साली कायमची बंदी घालण्यात आली.

  • 13/21

    तेव्हापासून ललित मोदी हे लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. ते एक फरार आरोपी आहेत.

  • 14/21

    आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुंबई विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध २०१५ साली अजामीनपत्र अटक वॉरंट जारी केले होते.

  • 15/21

    याशिवाय मॉडेल गुरप्रीत गील आर्थिक फसवणूकप्रकरणातही ललित मोदी दोषी आढळले आहेत.

  • 16/21

    याप्रकरणी मार्च २०२२ मध्ये युके न्यायालयाने मोदी यांना आठ लाख डॉलरची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

  • 17/21

    ललित मोदी यांनी १९९१ साली मिनल मोदी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.

  • 18/21

    परंतु, २०१८ साली त्यांच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीचा मृत्यू झाला.

  • 19/21

    आता सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे ललित मोदी पुन्हा चर्चेत आले आहेत.

  • 20/21

    (सर्व फोटो : ललित मोदी/ इन्स्टाग्राम)

  • 21/21

    (हेही पाहा : सुष्मिता सेन डेट करत असलेल्या ललित मोदींचा लंडनमध्ये आहे आलिशान बंगला, एकूण संपत्ती माहितीये?)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending NewsबॉलिवूडBollywoodललित मोदीLalit Modi

Web Title: Who is lalit modi dating bollywood actress sushmita sen ipl founder know more about him photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.