-
क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती यासरख्या अनेक क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना उद्योजग आनंद महिंद्रांनी थार कार भेट दिली आहे.
-
भारताची बॅडमिंटनपटू पी,व्ही सिंधू हिने २०१६ मध्ये ऑलंपिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी तिला थार कार भेट दिली होती.
-
मोहम्मद सिराजचे वडील हैदराबादमध्ये ऑटोचालक होते. टीम इंडियासोबत सिराज जेव्हा ऑस्ट्रेलियाला पोहोचला, त्याचवेळी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. मात्र सिराजने सामना खेळण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच मालिकेत त्याने पाच विकेट घेत अप्रतिम कामगिरी केली होती. या कामगिरीमुळे आनंद महिंद्रा यांनी त्याला थार कार भेट म्हणून दिली.
-
टी नटराजन यांचे वडील रोजंदारी मजूर आहेत, एक काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे स्पायक्स शूज खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. मात्र नटराजनने आपल्या आयपीएलमध्ये शानदार खेळाने सर्वांची मने जिंकली होती. आनंद महिंद्रांनी खूष होत त्याला थार कार भेट दिली होती.
-
नवदीप सैनी हा कर्नाल येथील बस चालकाचा मुलगा आहे. दिल्लीचा प्रथम श्रेणीचा खेळाडू सुमित नरवाल याने सैनीला रणजी ट्रॉफीच्या नेट सरावासाठी आणले होते. त्यावेळी तत्कालीन कर्णधार गौतम गंभीरने त्याची या स्पर्धेसाठी निवड केली होती.
-
भारताची कुस्तीपटू साक्षी मलिक हिने २०१६ च्या ऑलंपिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्यावर महिंद्रा कंपनीकडून तिला थार कार भेट मिळाली होती.
-
शुभमन गिलकडे भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. शुभमनने टीम इंडियाच्या अंडर-१९ मध्ये वर्ल्ड कप खेळला आहे.
-
सुंदर वॉशिंगटन यानेसुद्धा १९ वर्ष वयाच्या आतील भारतीय संघात चकदार कामगिरी करुन दाखवली होती.
-
शार्दुल ठाकूरनेही भारतीय संघात चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत शार्दुलने शिक्षण घेतले आहे. ठाकूरच्या या चमकदार कामगिरीमुळेच आनंद महिंद्रा यांनी त्याला थार काऱ भेट दिली होती.
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज