-
द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. त्या देशाच्या १५व्या राष्ट्रपती असतील. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. निवडणूक जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.
-
पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे.
-
भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली यावेळी नड्डा यांनी मुर्मू यांना हिमाचली टोपी आणि शाल भेट दिली.
-
राष्ट्रपती निवडणूक जिंकल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या जे.पी नड्डा यांना मुर्मू यांनी लाडू भरवून तोंड गोड केले.
-
शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या अमित शाह यांना मुर्मू यांनी लाडू भरवला.
-
गृहमंत्री अमित शाह यांनीसुद्धा द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले.
-
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्धा पुष्पगुच्छ देत द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले.
-
धर्मेंद्र प्रधान यांनी द्रौपदी मुर्मू यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केले.
-
तत्पूर्वी, देशातील जवळपास प्रत्येक राज्यात भाजप कार्यकर्त्यांनी द्रौपदी मुर्मूचा विजयानंतर जल्लोष केला.
-
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर भाजपा महिला कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला.
Photos : कुणी दिली ‘हिमाचल टोपी’ तर कुणी दिली ‘शाल’; राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
देशातील प्रमुख नेत्यांनी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन विजयाबद्दल अभिनंदन केले.
Web Title: Bjp leaders meet and congrats to draupadi murmu after president of india elecation winning dpj