• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. industries minister uday samant on dahi handi as adventure sports and five percent quota scsg

गोविंदांना ५ टक्के आरक्षण देण्यामागील सूत्र उदय सामंतांनी समजावून सांगितलं; MPSC च्या विद्यार्थ्यांचा उल्लेख करत म्हणाले, “दहीहंडी…”

दहीहंडीचा खेळ ऑलंपिकमध्ये पोहोचेल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

August 22, 2022 18:54 IST
Follow Us
  • Industries Minister Uday Samant on dahi handi as adventure sports and five percent quota
    1/12

    दहीहंडीला ‘साहसी खेळा’चा दर्जा दिल्यामुळे हा खेळ ऑलंपिकमध्ये पोहोचेल असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

  • 2/12

    दहीहंडीच्या माध्यमातून देशाचे नाव जागतिक पातळीवर जाईल, असा दावा सामंत यांनी यावेळी बोलताना केला.

  • 3/12

    दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देऊन त्यासाठी सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देण्याच्या एकनाथ शिंदे- फडणवीस सरकारच्या निर्णयावर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे.

  • 4/12

    क्रीडा, राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतून या निर्णयास विरोध होत आहे.

  • 5/12

    त्यामुळे कोंडीत सापडलेल्या सरकारच्या विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बचावासाठी उदय सामंत आणि आमदार प्रताप सरनाईक पुढे आले.

  • 6/12

    दहीहंडी फोडणाऱ्या गोंविंदासाठी नोकरीत आरक्षण जाहीर करण्यात आल्याने काहींचा गैरसमज झाला आहे, असं सामंत म्हणाले आहेत.

  • 7/12

    सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून दहीहंडी या खेळाबाबतची नियमावली तयार केली जाणार आहे, असं सामंत म्हणाले.

  • 8/12

    क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून क्रीडा खाते तयार करणार आहे, असंही त्यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयाबद्दल बोलताना स्पष्ट केलं आहे.

  • 9/12

    दहीहंडीसंदर्भात ही नियमावली तयार करताना वयोगट, शिक्षण, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा याचा विचार करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

  • 10/12

    त्यामुळे शिक्षण आणि अन्य निकष पूर्ण करणाऱ्या गोविंदाना अन्य खेळाडूंप्रमाणे नोकरी मिळेल असेही सामंत यांनी शिंदे सरकारची बाजू मांडताना यावेळी स्पष्ट केले.

  • 11/12

    या खेळासाठी पाच टक्के आरक्षण दिलेले नाही तर खेळाडूंसाठी जे पाच टक्के आरक्षण आहे, त्यात कबड्डी, खोखोप्रमाणेच दहीहंडीचा समावेश करण्यात येणार आहे, असंही सामंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाच्या बाजूने बोलताना स्पष्ट केलं.

  • 12/12

    त्यामुळे खेळाडू आणि राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नसल्याचेही शिंदे सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या सामंत यांनी सांगितले.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदहीहंडी २०२५Dahihandi 2025

Web Title: Industries minister uday samant on dahi handi as adventure sports and five percent quota scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.