-
मुंबईत गणेशोत्सवाची धूम काही वेगळीच असते. त्यातून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तगण आतुर झालेले असतात. सामान्य माणूस असो अथवा सेलिब्रेटी गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येकजण या राजाच्या चरणी नतमस्तक होतो.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
-
यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या.
-
राज ठाकरेसोबत त्यांचे कार्यकर्त्यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
लालबागच्या राजाचं दर्शन घेतना राज ठाकरे बाप्पा चरणी नतमस्तक झाले.
-
राज ठाकरेंना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
-
दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरेंनी उपस्थित लोकांनाही अभिवादन केलं.
-
राज ठाकरेंनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
-
जून महिन्यात राज ठाकरेंवर हीप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली.
-
राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात घरात ‘शिवतीर्थ’मध्येही गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.
-
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक भाजपा नेत्यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती.
-
राज ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून येत होते.
मनसेचे ‘राज’ लालबागच्या ‘राजा’चरणी नतमस्तक, सपत्निक घेतले दर्शन; पाहा खास Photo
राज्यात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. जवळपास दोन वर्षांनी हा सण साजरा करण्यात येत आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.
Web Title: Mns chief raj thackeray and his wife visited ganesha darshan of lalbaghcha raja dpj