Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. prime minister narendra modi emotional while paying tribute to shinzo abe funeral see photos pvp

PM Shinzo Abe’s funeral : शिंजो आबेंना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक; पाहा Photos

पंतप्रधान मोदी आणि आबे यांच्यात बरीच जवळीक होती. आबे यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी भावनिक ब्लॉग लिहिला.

September 27, 2022 18:22 IST
Follow Us
  • Prime Minister Narendra Modi emotional while paying tribute to Shinzo Abe funeral
    1/12

    जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर टोकियोतील निप्पॉन बुडोकान कम्युनिटी सेंटरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • 2/12

    अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते उपस्थित होते.

  • 3/12

    जपानच्या नारा शहरातील प्रचारसभेदरम्यान आबे यांची ८ जुलैला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या पार्थिवावर १५ जुलैला अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

  • 4/12

    आबे यांच्या सन्मानार्थ भारताने ९ जुलै रोजी राष्ट्रीय शोकही जाहीर केला. त्यानंतर शिंजो आबेंवर जपान सरकारकडून आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • 5/12

    आज पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचीही भेट घेतली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, पंतप्रधान किशिदा यांच्यासोबत फलदायी भेट झाली आहे.

  • 6/12

    यावेळी त्यांनी विविध द्विपक्षीय विषयांवर चर्चा केली. तसेच, माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

  • 7/12

    पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘मी मागच्या वेळी आलो होतो तेव्हा माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी अनेक तास चर्चा केली होती.’ संपूर्ण भारत आबेंची आठवण करत असल्याचे मोदी म्हणाले.

  • 8/12

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, जागतिक प्रभाव निर्माण करण्यात भारत आणि जपानच्या मैत्रीचा मोठा वाटा आहे. मला खात्री आहे की तुमच्या नेतृत्वाखाली भारत-जपान संबंध अधिक दृढ होतील. जगातील समस्या सोडवण्यासाठी आपण योग्य भूमिका बजावू शकू.

  • 9/12

    द्विपक्षीय बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदी आणि फुमियो किशिदा यांच्यात दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या कल्पनांवर चर्चा झाली. यासोबतच दोन्ही नेत्यांनी अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.

  • 10/12

    पंतप्रधान मोदी आणि आबे यांच्यात बरीच जवळीक होती. आबे यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी भावनिक ब्लॉग लिहिला.

  • 11/12

    पीएम मोदी म्हणाले, ‘शिंजो आबे हे केवळ जपानचे महान व्यक्तिमत्त्व नव्हते, तर एक मोठे व्यक्तिमत्त्व असलेले जागतिक राजकारणी होते. ते भारत-जपान मैत्रीचे मोठे समर्थक होते. ते आता आपल्यात नाही याचे खूप दुःख आहे…

  • 12/12

    त्यांच्या अकाली जाण्याने जपानसह संपूर्ण जगाने एक महान दूरदर्शी नेता गमावला आहे, तर मी माझा एक प्रिय मित्र गमावला आहे.’ (Photos : ANI)

TOPICS
जपान न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiशिंजो आबेShinzo Abe

Web Title: Prime minister narendra modi emotional while paying tribute to shinzo abe funeral see photos pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.