-
रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश बई हे अलीकडेच राजस्थान मधील राजसमंद जिल्ह्यात स्थित श्रीनाथजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
-
मुकेश अंबानी हे होणाऱ्या सुनबाई राधिका मर्चंट हिच्यासोबत भगवान श्रीनाथजी यांच्या दर्शनाला पोहोचले होते. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोमध्ये मुकेश अंबानी यांच्यासह मंदिराचे महंत बोलताना दिसत आहेत, विशेष म्हणजे या फोटोत अंबानी चक्क हात जोडून उभे आहेत.
-
अंबानींनी हात जोडल्याने हे महंत नक्की कोण आहेत याबाबत अनेकांना प्रश्न पडू लागला. प्राप्त माहितीनुसार महंतांचे नाव गोस्वामी भूपेश कुमार असे आहे.
-
गोस्वामी भूपेश कुमार यांना बाबा विशाल या नावानेही ओळखले जाते.
-
विशाल बाबा हे श्रीनाथ मंदिराचे महंत व तिलकायत महाराजांचे सुपुत्र आहेत.
-
या फोटोमध्ये आपण पाहू शकता राजस्थानच्या राजघराण्यातील राजकुमारी दिया या विशाल बाबांचा आशीर्वाद घेत आहेत. (Photo: Diya Kumari twitter)
-
वल्लभ सांप्रदायातील भक्तिपीठ श्रीनाथ मंदिर हे अत्यंत प्रसिद्धआहे . राजस्थान मधील अनेक राजघराण्यातील इथे दर्शनासाठी येत असतात.
-
श्रीनाथजी मंदिर हे श्रीकृष्णाचे एकमेव असे मंदिर आहे जिथे कृष्णजन्माष्टमीला २१ तोफांची सलामी दिली जाते.
Photos: मुकेश अंबानी ज्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले.. ‘बाबा विशाल’ आहेत तरी कोण?
मुकेश अंबानीच नव्हे तर नीता अंबानी यांची सुद्धा सर्व देवांवर प्रचंड श्रद्धा आहे याची प्रचिती अनेकवेळा त्या आयपीएलचे सामने बघत असतानाही आली होती.
Web Title: Mukesh ambani bows down in front of baba vishal of shreenathji temple with radhika merchant svs