Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pedestrian day celebrated in pune young group dance and sing song photos rmm

Photos: पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; तरुणाईचा रस्त्यावर जबरदस्त डान्स, गाणी अन्…

नाच, गाणी, मर्दानी खेळ अशा उत्साही वातावरणात पुणेकरांनी रविवारी वाहनमुक्त रस्त्याचा अनुभव घेतला.

December 12, 2022 00:01 IST
Follow Us
  • पुणे : नाच, गाणी, मर्दानी खेळ अशा उत्साही वातावरणात पुणेकरांनी रविवारी वाहनमुक्त रस्त्याचा अनुभव घेतला.
    1/12

    पुणे : नाच, गाणी, मर्दानी खेळ अशा उत्साही वातावरणात पुणेकरांनी रविवारी वाहनमुक्त रस्त्याचा अनुभव घेतला.

  • 2/12

    आकर्षक पद्धतीने रंगविलेले रस्ते, रस्त्यावर विनाअडथळा फिरणारे पादचारी, रस्त्यावर खेळणारी लहान मुले, सारंगीचे मधूर सूर, असे उत्साही वातावरणाचा अनुभव पादचारी दिनानिमित्त पादचाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावर घेतला.

  • 3/12

    पादचाऱ्यांना अडळामुक्त मार्गक्रमण करता यावे, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने रविवारी लक्ष्मी रस्त्यासह २१ रस्त्यांवर पादचारी दिन उपक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले.

  • 4/12

    लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक सकाळी अकरा ते दुपारी चार या कालावधीत वाहनमुक्त ठेवण्यात आला.

  • 5/12

    या ठिकाणी वॉकिंग प्लाझासह स्थानिक गटांच्या सहकार्याने लक्ष्मी रस्त्यावर मनोरंजक आणि संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले.

  • 6/12

    महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते या उपक्रमाचे सकाळी उद्‍घाटन झाले.

  • 7/12

    एरवी लक्ष्मी रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गर्दी असेच चित्र दिसून येते. पादचारी दिनानिमित्त रविवार त्याला अपवाद ठरला.

  • 8/12

    पादचाऱ्यांनी मोकळ्या वातावरणाचा अनुभव घेतला.

  • 9/12

    पादचारी दिनानिमित्त रस्त्याला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली होती.

  • 10/12

    शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, सारंगीचे सूर, बॅण्डच्या तालावर थरकणारी तरूणाई असे वातावरण या रस्त्यावर दिसून आले.

  • 11/12

    विना अडथळा चालण्याचा अनुभवही पादचाऱ्यांनी यानिमित्ताने घेतला. उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक या दरम्यान पादचारी दिन साजरा करण्यात आला.

  • 12/12

    लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद आज सकाळपासून ठेवण्यात आली होती. पादचारी दिन साजरा करणारी पुणे ही देशातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे.

TOPICS
पुणे न्यूजPune News

Web Title: Pedestrian day celebrated in pune young group dance and sing song photos rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.