-
बजरंगाचे नाव घेतले की डोळ्यासमोर येतो तो कायम रामाची सोबत करणारा बजरंगबली म्हणजेच हनुमान. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘बजरंग’ हा वाघही त्यापेक्षा कमी नाही.
-
धिप्पाड शरीरयष्टीचा हा वाघ म्हणजे ताडोबाची शान आणि त्याने या व्याघ्रप्रकल्पातील मोठ्या क्षेत्रावर स्वत:चे साम्राज्य स्थापन केले आहे.
-
२०११ मध्ये वाघडोह येथे झालेल्या संघर्षानंतर मोहर्ली पर्वतरांगेतून ‘येडाअण्णा’चे वर्चस्व संपुष्टात आले. त्यानंतर ‘माधूरी’ आणि ‘वाघडोह’ यांची वंशावळ समोर आली.
-
ज्या तेलिया बहिणी म्हणून ओळखल्या गेल्या. त्या वयाच्या विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर ‘माधुरी’ने तिचे क्षेत्र आणि ‘वाघडोह’ला देखील सोडले.
-
२०१५ मध्ये मोहर्लीत जेव्हा कोणत्याही वाघाचे वर्चस्व नव्हते तेव्हा अचानक त्याठिकाणी ‘बजरंग’ पोहोचला.
-
तो कोण, कुठला हे कुणालाही माहिती नव्हते. त्याच्या वंशाचा देखील पत्ता नव्हता. मात्र, तो कोलारा बफर परिसरातून आल्याची चर्चा त्यावेळी होती.
-
त्यानंतर ‘बजरंग’ने आपले क्षेत्र वाढवण्यास सुरुवात केली. यादरम्यान अनेक वाघिणी त्याच्या अधिपत्याखाली आल्या.
-
अनेक शावकांचा तो वडील असला तरी वाघिणींना आपलेसे करण्यासाठी त्याने अनेक शावकांचा बळी देखील घेत. सोनम, लारा, मोना, नवीन वाघडोह मादी, देवडोह, देवडोह नवीन मादी, कोलारा बफर वाघीण, छोटी तारा अशा अनेक वाघिणींची त्याची जोडी जमली.
-
ताडोबातील कोणत्याही वाघांपैकी तो कदाचित सर्वात मोठा वाघ आहे. सर्वाधिक वाघिणींना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा कदाचित त्याचा रेकॉर्ड आहे. ताडोबा हे ‘बजरंग’चे साम्राज्य आहे.
-
सर्व छायाचित्रे – अरविंद बंडा (हेही पाहा : जगाला वेड लावणारा ‘जय’ वाघ)
Photos: चर्चेतला वाघ – ताडोबाची शान ‘बजरंग’ वाघ
ताडोबातील कोणत्याही वाघांपैकी तो कदाचित सर्वात मोठा वाघ आहे. सर्वाधिक वाघिणींना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा कदाचित त्याचा रेकॉर्ड आहे.
Web Title: Maharashtra tadoba national park andhari wildlife sanctuary bajrang male information nagpur tiger images rgc 76 sdn