• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. supriya sule nana patole to sanjay raut thaughts on anjali damania claim that ajit pawar will join bjp asc

Photos : अंजली दमानियांमुळे राजकारणात भूकंप? वाचा अजित पवारांपासून सुप्रिया सुळेंपर्यंत कोण काय म्हणालं?

“अजित पवार भाजपात जातील”; अंजली दमानियांच्या दाव्यावर राज्यातल्या नेत्यांना काय वाटतं? पाहा सुप्रिया सुळे, संजय राऊतांपासून नाना पटोलेंपर्यंतच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया

April 12, 2023 18:57 IST
Follow Us
  • political_leaders_Thaughts_on_Ajit_Pawar_Join_BJP ०००
    1/9

    संजय राऊत : अजित पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. तसेच ते स्वाभिमानी आहेत, त्यांचा कणा नेहमी ताठ असतो. अजित पवार हे बाणेदार असं नेतृत्व आहे ते जाऊन मिंध्याप्रमाणे गुलामी करतील असं मला वाटत नाही.

  • 2/9

    संजय राऊत : अंजली दमानिया यांना भाजपाकडून ही माहिती मिळाली असेल तर त्यांनी ती जाहीर केली असेल. अजितदादा असं काही करतील असं मला तरी वाटत नाही. शेवटी प्रत्येकजण व्यक्तिगत काही निर्णय घेत असतात. परंतु मी अजित पवारांना जितकं ओळखतो, अलिकडे जे काही पाहिलंय त्यावरून सांगेन की, अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करतील, असं मला वाटत नाही.

  • 3/9

    सुप्रिया सुळे : “ट्विटर किंवा अंजलीताई यांना अजूनतरी या देशात स्वत:चं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचं ट्वीट मी काही वाचलेलं नाही. पण त्यांनी काही लिहिलं असेल, तर त्यांना तो अधिकार आहे”

  • 4/9

    सुप्रिया सुळे : “१५ मिनिटांनी इथे मुळशीत पाऊस पडेल का? याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. आत्ता उन आहे हे मी सांगू शकते. पण १५ मिनिटांनी पाऊस पडेल की नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही”

  • 5/9

    नाना पटोले : अंजली दमानियांनी जे ट्वीट केलं आहे. ते त्यांचं वैयक्तिक मत असेल. मी त्याबाबत जास्त बोलणं योग्य ठरणार नाही. मात्र, माझं मत विचारायचं झाल्यास अजित पवार असं काही करतील किंबहूना ते भाजपाबरोबर जातील असं वाटत नाही.

  • 6/9

    दीपक केसरकर : अंजली दमानिया यांच्या प्रश्नांवर मी उत्तर द्यायला लागलो तर कसं व्हायचं. त्या ट्वीटबद्दल तुम्ही दमानियांना विचारलं पाहिजे. त्यांना तुम्ही विचारा की, सुप्रीम कोर्टाकडून त्यांना काही निरोप आला आहे का. मुळात सुप्रीम कोर्टाबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे.

  • 7/9

    चंद्रशेखर बावनकुळे : जर-तरला काही अर्थ नाही, सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आत्ताच काही टिप्पणी करणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान ठरेल. मला वाटतं आपण निकालाची वाट पाहायला हवी.

  • 8/9

    अजित पवार : अंजली दमानियांच्या दाव्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे.”

  • 9/9

    अंजली दमानियांचं वक्तव्य काय होतं? : आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.

TOPICS
अंजली दमानियाAnjali Damaniaअजित पवारAjit Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Supriya sule nana patole to sanjay raut thaughts on anjali damania claim that ajit pawar will join bjp asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.