• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. abducted and beaten with sticks imran khan allegations pak supreme court rmm

Photos: “जबरदस्तीने अपहरण केलं आणि काठीने…”, कोठडीतील अत्याचाराबाबत इम्रान खानचे गंभीर आरोप

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.

May 11, 2023 20:34 IST
Follow Us
  • pakistan ex pm imran khan arrest
    1/12

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांना गुरुवारी पाकिस्तान रेंजर्संनी अटक केली होती.

  • 2/12

    इम्रान खान सुनावणीसाठी इस्लामाबाद न्यायालयात हजर झाले होते. याचवेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.

  • 3/12

    पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे.

  • 4/12

    इम्रान खान यांची तातडीने सुटका करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

  • 5/12

    गुरुवारी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

  • 6/12

    या याचिकेवर पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल, न्यायमूर्ती मुहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अतहर मिनल्लाह या तीन सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी पार पडली.

  • 7/12

    न्यायाधीशांनी इम्रान खान यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.

  • 8/12

    ७० वर्षीय इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयात हजर केले असता त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.

  • 9/12

    इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून पाकिस्तानी रेंजर्संनी आपलं अपहरण केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्याला काठीने मारहाण केली.- इम्रान खान

  • 10/12

    एखाद्या गुन्हेगारालाही अशी वागणूक दिली जात नाही. माझ्याबरोबर काय घडतंय? हेही मला अजून माहीत नाही, असा इम्रान खान यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितंल.

  • 11/12

    इम्रान खान यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सुटकेचे आदेश दिले असले तरी इम्रान खान यांना अद्याप मुक्त करण्यात आलं नाही.

  • 12/12

    सुरक्षेचं कारण सांगून घरी जाण्याची परवानगी नाकारली आहे. त्यांना इस्लामाबादच्या पोलीस लाईन गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात येणार आहे. (सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस/लोकसत्ता)

TOPICS
पाकिस्तानPakistanपीएम इम्रान खानPM Imran Khan

Web Title: Abducted and beaten with sticks imran khan allegations pak supreme court rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.