Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. congress rule in karnataka the legislative session was also decided but what about the promises chief minister said sgk

कर्नाटकात काँग्रेसचे राज्य; विधिमंडळ अधिवेशनही ठरले, पण आश्वासनांचं काय? मुख्यमंत्री म्हणाले…

Karnataka Swearing-in Ceremony : कर्नाटकात काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. आज शपथविधी झाला असून मंत्रिमंडळही स्थापन झालं आहे.

May 20, 2023 17:10 IST
Follow Us
  • कर्नाटकात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली असून सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कायद्याच्या चौकटीत राहून मी माझं कर्तव्य पार पाडेन असं आश्वासन त्यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे. (फोटो - सिद्धरामय्या ट्विटर)
    1/2

    कर्नाटकात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली असून सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कायद्याच्या चौकटीत राहून मी माझं कर्तव्य पार पाडेन असं आश्वासन त्यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे. (फोटो – सिद्धरामय्या ट्विटर)

  • 2/2

    कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना शपथ दिली. (फोटो – सिद्धरामय्या ट्विटर)

  • 3/2

    काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते या सोहळ्याला उपस्थित होते. (फोटो – सिद्धरामय्या ट्विटर)

  • 4/2

    डी. के. शिवकुमार यांनीही पक्षनिष्ठता दाखवत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आणि उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. (फोटो – डी. के. शिवकुमार ट्विटर)

  • 5/2

    या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधीही उपस्थित होते. त्यांनी कर्नाटकातील जनतेचे यावेळी आभार मानले. (फोटो – राहुल गांधी ट्विटर)

  • 6/2

     भाजपाकडे धन, दौलत, शक्ती, पोलीस सगळं काही होतं. त्यांच्या पूर्ण ताकदीला कर्नाटकच्या जनतेने हरवलं, त्यांच्या भ्रष्टाचाराला हरवलं. त्यांच्या द्वेषाला हरवलं, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

  • 7/2

    जी परमेश्वरा, के एच मुनियप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, सतीश जारकीहोली, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी आणि बी झेड जमीर अहमद खान यांनी सिद्धरामय्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

  • 8/2

    आमच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी नवीन प्रवास सुरू करत असताना, मी वचन देतो की काँग्रेस सरकार शाश्वत प्रगती आणि सर्वांच्या कल्याणाची हमी देईल, असं ट्वीट डी. के. शिवकुमार यांनी केलं आहे. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

  • 9/2

    राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या निवडणुकीत प्रचाराचा धडाका लावला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कर्नाटकात सत्ता काबिज करण्यात आली, असं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.(फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

  • 10/2

    सिद्धरामय्या आणि डी.के शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चुरस लागली होती. दोघेही या शर्यतीतून माघार घ्यायला तयार नव्हते. दोघांच्याही समर्थकांची संख्या जास्त होती. अखेर हे प्रकरण हायकमांडकडे गेले. बैठका झाल्या. निरीक्षण समिती गठीत झाली. अनेक चर्चेअंती मुख्यमंत्री पदावर सिद्धरामय्या यांची निवड झाली आणि डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

  • 11/2

    शनिवारी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी शपथ घेतल्यावर बंगळुरूमधील रस्त्यांवर रंगीबेरंगी बॅनर लावण्यात आले होते. शपथविधी झाल्यानंतर नवनियुक्त मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसने दिलेल्या पाच आश्वसानांची पूर्तता करण्याकरता सरकारला ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

  • 12/2

    कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सोमवार, मंगळवार आणि बुधवारी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

TOPICS
कर्नाटक निवडणूकKarnataka Electionमराठी बातम्याMarathi News

Web Title: Congress rule in karnataka the legislative session was also decided but what about the promises chief minister said sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.