Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

कर्नाटक निवडणूक

कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी होत आहे. कर्नाटक विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २२४ आहे. त्यासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण ५ कोटी १ लाख मतदार सहभागी होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या ८०हून जास्त वयाच्या मतदारांची संख्या तब्बल १२.१५ लाख इतकी आहे. या निवडणुकीत ९ लाख १७ हजार नवमतदार मतदान करणार आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या ५८ हजार २८२ तर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ८८३ मतदार मतदान करतील. १३२० मतदान केंद्र पूर्णपणे महिलांकडून सांभाळली जाणार आहेत, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली. कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी आणि निकाल १३ मे रोजी लागणार आहे.

कर्नाटकमध्ये २०१८ साली झालेल्या २२२ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवत कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरी बहुमतापासून त्यांना दूर राहावे लागले. काँग्रेसने ७८ तर जेडीएसने ३७ जागा मिळवल्या होत्या. तर बहुजन समाज पक्ष १, कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी १ आणि अपक्ष १ असे इतर उमेदवार निवडून आले होते. बहुमताचा आकडा ११२ असल्यामुळे २०१८ साली विधानसभा त्रिशंकू झाली होती.

येडियुरप्पा यांनी सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे त्यांचे सरकार गडगडले. त्यानंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (JDS) संयुक्त सरकार सत्तेत आले. पण काँग्रेस व जनता दलाचे आमदार २०१९ साली फुटल्याने एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार १४ महिन्यांतच कोसळले. त्यानंतर पुन्हा येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. जुलै २०२१ मध्ये येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून भाजपने मूळ जनता दलातून आलेल्या बसवराज बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली.

कर्नाटक विधानसभेच्या मागच्या काही निवडणुकांचा कल पाहिला तर कोणत्याही पक्षाला आपल्या सलग दोन निवडणुकीत बहुमत मिळवता आलेले नाही. २००८ साली भाजपाने ११० जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. तर २०१३ साली काँग्रेसने १२२ जागा जिंकून सरकार स्थापन केले. त्यानंतर पुन्हा २०१८ साली सुरुवातीला भाजपा, त्यानंतर काँग्रेस-जेडीएस आणि त्यानंतर दीड वर्षातच पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन झाले होते. त्यामुळे यंदा २०२३ साली कुणाचे सरकार स्थापन होणार, हे पाहण्यासाठी १३ मे ची वाट पाहावी लागेल.
Read More
K Sudhakar distributed bottles of liquor to People to celebrate his Lok Sabha victory
Karnataka: भाजपा खासदाराची जंगी पार्टी; लोकांना वाटल्या चक्क दारुच्या बाटल्या

कर्नाटकमधील चिक्कबल्लापूर येथील भाजपा खासदार के सुधाकर यांनी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीत लोकांना दारुच्या…

This is PM Modi's moral and political defeat Jairam Ramesh
“हा पंतप्रधान मोदींचा नैतिक आणि राजकीय पराभव”: जयराम रमेश

पंतप्रधान स्वतःच्या मतदारसंघातून मागे पडतात असे याआधी कधीच घडले नव्हते. वाराणसीतील परिस्थिती फक्त ट्रेलर आहेत,” जयराम रमेश असे शब्दात त्यांनी…

Prajwal Revanna
कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरण : प्रज्वल रेवण्णाकडून एसआयटीच्या प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरं

कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णा पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येत आहे

H D Kumaraswamy News
एचडी कुमारस्वामींचं प्रज्वल रेवण्णा यांना आवाहन; म्हणाले, “भारतात परत या आणि कुटुंबाची…”

कर्नाटकमध्ये खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडल प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. आता एचडी कुमारस्वामी यांनी त्यांचा पुतण्या प्रज्ज्वल…

MP Prajwal Revanna Sex Scandal case
सेक्स स्कँडल प्रकरणी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर निलंबनाची कारवाई; जेडीएस पक्षाचा निर्णय

माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

prajwal revanna sexual scandal marathi news
लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होताच देवेगौडा यांच्या नातवाचे परदेशात पलायन

आमदार पुत्र रेवण्णा यांच्या विरोधात त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे.

Sanjay Patil vs laxmi hebbalkar
“त्यांना एक पेग…”, भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांची महिला मंत्र्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी

भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

Kiran Mazumdar-Shaw Electoral Bonds Data
तुम्हालाही पैसे मागितलेले? राजकीय पक्षांना कोट्यवधींचं दान देणाऱ्या उद्योजिकेचं थेट उत्तर, म्हणाल्या…

EC Shares Electoral Bonds Data : निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या पहिल्या ३० कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या अशा आहेत…

siddhramaiya shivkumar
Loksabha Election: कर्नाटक काँग्रेससमोर भाजपा-जेडीएस युतीचे आव्हान, सिद्धरामय्या-शिवकुमार यांची जोडी निवडणुकीसाठी तयार

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांना खूश ठेवण्यात सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Karnataka Jds bjp member in rajyasabha
Rajyasabha Election : कर्नाटकात कुपेंद्र रेड्डी निवडणूक रिंगणात; क्रॉस व्होटिंगची शक्यता; काँग्रेसपुढे मोठे आव्हान

जेडी(एस)-भाजपा युतीने डी. कुपेंद्र रेड्डी रिंगणात उतरवले आहे. जेडी(एस)-भाजपा युतीचा पाचवा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने काँग्रेस पक्ष अडचणीत आला…

BJP-JD(S) seat sharing
भाजपा-जेडी(एस) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, कुमारस्वामी चिक्कबल्लापूरमधून लढण्याची शक्यता, गौडांबाबत अस्पष्टता

कुमारस्वामी यांचा आणखी एका जागेवर विचार केला जात आहे, तो म्हणजे मंड्या मतदारसंघ आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी १७ जानेवारी रोजी दिल्लीत…

संबंधित बातम्या