Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pm narendra modi explained india australia relations with 3c 3d 3e asc

“कधी सी, कधी डी, तर कधी ई…”, सिडनीत भारत-ऑस्ट्रेलियाच्या नात्यावर बोलले नरेंद्र मोदी; म्हणाले, “क्रिकेटनंतर मास्टरशेफ…”

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनीतल्या एरिना स्टेडियमवरून भाषण केलं.

May 23, 2023 18:43 IST
Follow Us
  • PM Narendra Modi on India Australia relations
    1/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी त्यांनी सिडनीतल्या एरिना स्टेडियमवर भाषण केलं. तसंच त्यांनी या भाषणात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध कसे आहेत त्यावर भाष्य केलं. (Narendra Modi Twitter)

  • 2/12

    नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, मी २०१४ ला ऑस्ट्रेलियाला आलो होतो, तेव्हा मी एक वचन दिलं होतं की तुम्हाला पुन्हा कोणत्याही भारतीय पंतप्रधानाची २८ वर्षे वाट पाहावी लागणार नाही. बघा आता मी पुन्हा तुमच्यासमोर हजर झालोय. (Narendra Modi Twitter)

  • 3/12

    नरेंद्र मोदी म्हणाले, यावेळी मी एकटा आलो नाही, तर एक खास व्यक्ती माझ्याबरोबर आहे. माझ्याबरोबर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनीसही आले आहेत. त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून या कार्यक्रमासाठी वेळ काढला, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.(Narendra Modi Twitter)

  • 4/12

    नरेंद्र मोदींनी यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संबंधांवर भाष्य केलं. ते म्हणाले, भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन सी कॉमन आहेत. कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी. नंतर म्हटलं गेलं भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंथ तीन डीवर आधारीत आहेत. डेमोक्रसी, डाएस्पोरा आणि दोस्ती. काहींनी हेही सांगितलं की भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध तीन ईवर आधारीत आहेत. एनर्जी, इकोनॉमी आणि एज्युकेशन. (Narendra Modi Twitter)

  • 5/12

    पंतप्रधान मोदी म्हणाले, कधी सी, कधी डी, तर कधी ई, वेगवेगळ्या काळात या गोष्टी कदाचित खऱ्याही राहिल्या आहेत. पण भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक संबंधांचा विस्तार यापेक्षा खूप मोठा आहे. (Narendra Modi Twitter)

  • 6/12

    पंतप्रधान म्हणाले, आता योगाही आपल्याला जोडतो. क्रिकेटमुळे तर आपण न जाणे कधीपासून जोडले गेलो आहोत. पण आता टेनिस आणि चित्रपटही आपल्याला जोडत आहेत. आपल्याकडे जेवण बनवायची पद्धत वेगवेगळी असेलही. पण आता मास्टरशेफ आपल्याला जोडतो. आपल्याकडे उत्सव वेगवेगळे साजरे केले जातात. पण आपण दिवाळीच्या रोषणाईने जोडले गेलो आहोत. (PC : ANI)

  • 7/12

    आपल्याकडे भाषा वेगवेगळ्या बोलल्या जातही असतील. पण आपण मल्याळी, तमिळ, तेलुगु, पंजाबी, हिंदी… ऑस्ट्रेलियाचे लोक, इथले नागरिक इतक्या विशाल हृदयाचे आहेत, मनाने इतके चांगले आहेत की भारताच्या या वैविध्याला त्यांनी खुल्या मनाने स्वीकारलं आहे. याच कारणामुळे पॅरामाटा स्क्वेअर कुणासाठी परमात्मा चौक बनतो. विक्रम स्ट्रीट फेमस होतो. हॅरिस स्पार्क अनेक लोकांसाठी हरीष पार्क होतो. (PC : ANI)

  • 8/12

    नरेंद्र मोदी म्हणाले, मी ऐकलंय की हॅरिस पार्कमध्ये चाट आणि जयपूर स्वीट्सची जिलबीही फेमस आहे. तुम्ही कधी माझे मित्र, तुमच्या पंतप्रधानांनाही तिथे कधी घेऊन जा. आणि जर जेवणाबद्दल आपण बोलतोय, चाटबद्दल बोलतोय तर लखनौचं नाव येणं साहजिकच आहे. मी ऐकलंय की सिडनीजवळ लखनौ नावाचं एक ठिकाणही आहे. पण मला हे माहिती नाही की तिथेही चाट मिळतं की नाही. (Indian Express Photo by Nirmal Harindran)

  • 9/12

    मोदी म्हणाले, इथेही दिल्लीजवळचे, लखनौचे लोक असतीलच ना. दिल्ली स्ट्रीट, बॉम्बे स्ट्रीट, कश्मीर अवेन्यू असे अनेक रस्ते इथे ऑस्ट्रेलियात तुम्हाला भारताशी जोडून ठेवतात. मला हे सांगितलं गेलं की आता तर ग्रेटर सिडनीमध्ये इंडिया परेडही सुरू होत आहे. मला हे ऐकून चांगलं वाटलं की तुम्ही सर्वांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा केला. (Indian Express Photo by Nirmal Harindran)

  • 10/12

    आपल्या क्रिकेटच्या संबंधांनाही ७५ वर्षं पूर्ण झाली आहेत. क्रिकेटच्या मैदानावरचा सामना जितका रंजक असतो, तितकीच दृढ ऑफ द फील्ड आपली मैत्री आहे. यावेळी तर ऑस्ट्रेलियाच्या अनेक महिला क्रिकेटपटूही पहिल्यांदा भारतात आयपीएल खेळायला आल्या होत्या. (PC : PTI)

  • 11/12

    नरेंद्र मोदी म्हणाले, भारताकडे ना साधनांची कमी आहे ना संसाधनांची. आज जगातली सर्वात मोठी टॅलेंट फॅक्टरी असणारा देश म्हणजे भारत आहे. (PC : PTI)

  • 12/12

    ब्रिस्बेनमध्ये भारताचा नवा दूतावास उघडला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दृढ होत असलेल्या भागीदारीच्या जोरावर प्रत्येक भारतीयाला त्याद्वारे मदत होईल. (Narendra Modi Twitter)

TOPICS
ऑस्ट्रेलियाAustraliaनरेंद्र मोदीNarendra Modi

Web Title: Pm narendra modi explained india australia relations with 3c 3d 3e asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.