-
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच बिहारमधील पाटणा येथे पार पडलेल्या विरोधकांच्या संयुक्त बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला उपस्थित राहिल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
-
उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पाटण्याला गेले, अशी टीका फडणवीसांनी केली.
-
यावर उद्धव ठाकरेंनी आक्रमक होत मला तुमच्या कुटुंबावर बोलावं लागलं तर तुम्हाला शवासन करावं लागेल, असा इशारा दिला. यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली.
-
उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब (पुस्तक) आहे.
-
ज्या ‘व्हॉट्सअॅप चॅट’बाबत तुम्ही (उद्धव ठाकरे) बोलत आहात, तो आरोपपत्राचा भाग आहे. हे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे. ते जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही- देवेंद्र फडणवीस
-
मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचं मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका, असा टोला फडणवीसांनी लगावला.
-
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण घुसलोच तर त्यांना (उद्धव ठाकरे) तोंड दाखवायला जागा उरणार नाही – देवेंद्र फडणवीस
-
तुमचे ‘नड्डे’ (घसा) केव्हा सैल होतील, हे समजणारदेखील नाही. तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या. आता शवासन कुणाला करावं लागतं, ते बघूच- देवेंद्र फडणवीस
-
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मी शुक्रवारी (२३ जून) शिवसैनिकांना सांगून पाटण्याला गेलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मनात आपली किती भीती बसली आहे. मी पाटण्याला गेलो, तर हे लगेच म्हणतात हे कुटुंब वाचवायला गेले आहेत.
-
देवेंद्र फडणवीसांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊ नये. फडणवीसांनाही कुटुंब आहे- उद्धव ठाकरे
-
फडणवीसांच्या कुटुंबातील व्हॉट्सअॅप चॅट बाहेर येत आहेत. आम्ही अद्याप त्यावर बोललेलो नाही- उद्धव ठाकरे
-
जर फडणवीसांच्या कुटुंबावर बोलावं लागलं, तर त्यांना केवळ शवासन करावं लागेल. त्यांना वेगळी कोणतीही आसनं झेपणार नाहीत. केवळ शवासन, फक्त पडून रहावं लागेल- उद्धव ठाकरे
“आम्ही कुणाच्या घरात घुसलोच तर…”, कटुंबावरील टीकेवरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना लक्ष्य केलं आहे.
Web Title: Devendra fadnavis criticise uddhav thackeray statement on family opposition meeting in patana rmm