Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ncp leader ajit pawar and some mlas joined shinde fadnavis led govt sharad pawar press conference rmm

अजित पवारांनी पक्षावरच ठोकला दावा; आता पुढे काय? शरद पवार मांडली भूमिका, म्हणाले…

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.

July 2, 2023 23:07 IST
Follow Us
  • अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.
    1/24

    अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.

  • 2/24

    पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, तर इतर नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

  • 3/24

    यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

  • 4/24

    देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी होतं- शरद पवार

  • 5/24

    त्या वक्तव्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन विभागात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला – शरद पवार

  • 6/24

    यामध्ये प्रधानमंत्र्यांनी जो आरोप केला, त्यानंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते- शरद पवार

  • 7/24

    त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त करण्यात आले त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे- शरद पवार

  • 8/24

    आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली- शरद पवार

  • 9/24

    पक्षाच्या संघटनात्मक बदलाचा विचार करण्यासाठी ६ जुलै रोजी पक्ष कार्यालात मी बैठक आयोजित केली होती- शरद पवार

  • 10/24

    त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली- शरद पवार

  • 11/24

    विधीमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल- शरद पवार

  • 12/24

    याचे कारण यापैकी काही सदस्यांनी आम्ही सही केली असली तरी आमची वेगळी भूमिका कायम आहे असे मला सांगितले- शरद पवार

  • 13/24

    याबाबत माझ्याशी संपर्क केलेल्या सहकाऱ्यांनी जनतेपुढे हे चित्र मांडले तर त्यांच्याबद्दल माझा विश्वास बसेल जर त्यांनी मांडले नाही तर त्यांची वेगळी भूमिका आहे, असा निष्कर्ष मी काढेल- शरद पवार

  • 14/24

    पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न राहिला तर आजचा प्रकार इतरांना नवीन असेल मात्र मला नवीन नाही- शरद पवार

  • 15/24

    १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. त्यापैकी महिन्याभराने सहा आमदारांच्या व्यतिरीक्त सगळे आमदार सोडून गेले- शरद पवार

  • 16/24

    माझ्यासहीत पाच आमदारांना सोबत घेऊन मी पुन्हा पक्षाची बांधणी केली. पुढच्या निवडणूकीत जे आम्हाला सोडून गेले त्यापैकी दोन-तीन जण सोडल्यास सगळे पराभूत झाले- शरद पवार

  • 17/24

    १९८० साली जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल, हा माझा एककलमी कार्यक्रम राहील- शरद पवार

  • 18/24

    माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषत: तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे- शरद पवार

  • 19/24

    चार वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभेतदेखील हेच चित्र होते. पण राज्यात जिथे जाता येईल तिथे जाणे, आपली भूमिका मांडणे, हे केले त्याचा परिणाम आमची संख्या वाढली आणि आम्ही संयुक्त सरकार स्थापन केले- शरद पवार

  • 20/24

    आज पुन्हा ती स्थिती आहे. या सर्व स्थितीत अनेकजण संपर्क करून आपण सर्व एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे, अशी मत मांडत आहेत- शरद पवार

  • 21/24

    आजचा दिवस संपल्यावर उद्या सकाळी कऱ्हाडला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार आहे- शरद पवार

  • 22/24

    त्यानंतर राज्यात आणि देशात जावून लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील- शरद पवार

  • 23/24

    अशी भूमिका शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून मांडली आहे.

  • 24/24

    (सर्व फोटो सौजन्य-फेसबूक)

TOPICS
अजित पवारAjit Pawarराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad Pawar

Web Title: Ncp leader ajit pawar and some mlas joined shinde fadnavis led govt sharad pawar press conference rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.