• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. why are there stones at the mumbai marine drive heres the reason why they are there pdb

मरिन ड्राईव्ह ते दादर, जुहू चौपाटीपर्यंत, प्रत्येक बीचवर तीनपायी दगड का ठेवलेले असतात? कारण जाणून थक्क व्हाल

मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर सर्व एकसारखे दगड कुठून आले? चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर…

July 26, 2023 11:19 IST
Follow Us
  • मरिन ड्राइव्ह… हे दोन शब्द पुरेसे आहेत एखाद्या मुंबईकराच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी. 
    1/15

    मरिन ड्राइव्ह… हे दोन शब्द पुरेसे आहेत एखाद्या मुंबईकराच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी. 

  • 2/15

    मुंबईतील सर्वात लोकप्रिय जगांपैकी एक अशी जागा मरिन ड्राइव्ह.

  • 3/15

    मरिन ड्राइव्हला मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाबरोबर ‘प्लॅन’ करुन गेला नाही असा अस्सल मुंबईकर सापडणे कठीण.

  • 4/15

    ही जागा प्रत्येक मुंबईकरासाठी खास आहे. अनेकजण मस्करीत म्हणतात, ‘मरिन ड्राइव्ह नही देखा तो क्या देखा.’ हेच मुंबईकरांचे लाडके पर्यटनस्थळ. 

  • 5/15

    मरीन ड्राईव्ह गेलं की किनाऱ्यावर दिसतात त्रिकोणी दगड. पण तुम्हाला माहितेय का मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर दगड का ठेवलेत?

  • 6/15

    मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर एकसारखे दगड कुठून आले, हे तुम्हाला माहितेय, चला तर जाणून घेऊया याच प्रश्नाचे उत्तर

  • 7/15

     १८ डिसेंबर १९१५ या दिवशी गिरगाव चौपाटीजवळ पहिला दगड ठेऊन मरिन ड्राइव्ह बांधण्यास सुरुवात करण्यात आली होती.

  • 8/15

    आपल्यापैकी फारच कमी लोकांना ठाऊक असेल की मरीन ड्राईव्हचा काही भाग हा रिक्लेम केलेला म्हणजेच समुद्रात भराव टाकून उभारण्यात आलेला आहे.

  • 9/15

    समुद्राला कृत्रीमरित्या आत सरकवून तयार केलेल्या मोकळ्या जागी मरीन ड्राईव्हवरील कित्येक इमारती आणि रस्ते उभे आहेत.

  • 10/15

    त्यामुळे रोजच्या रोज अरबी समुद्रातून येणाऱ्या तडाखेबाज लाटांपासून त्यांचे संरक्षण करणे गरजेचे बनते.

  • 11/15

    याच वेगवान आणि शक्तिशाली लाटांपासून किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर ठेवण्यात आलेले तीनपायी सिमेंटचे दगड कामी येतात. 

  • 12/15

    या दगडांना दगडांना ‘टेट्रापॉड’ म्हणतात. टेट्रापॉड नैसर्गिक नसून ते मानवाने बनवले आहेत आणि ते दगड एका खास कारणासाठी बनवले गेले आहेत. हे सर्व दगड समान आकाराचे आहेत.

  • 13/15

    जेव्हा समुद्रातील महाकाय लाटा टेट्रापॉडवर येऊन आदळतात तेव्हा या लाटांचा तडाखा हे दगड झेलतात.

  • 14/15

    मरिन ड्राइव्हच्या कठड्यावर सतत लाटा धडकत असल्याने हा लाटांचा मार शोषण्यासाठी संपूर्ण परिसरात टेट्रापॉडचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे दगड समुद्राच्या कठड्यावर ठेवण्यात आले आहेत.

  • 15/15

    नव्वदच्या दशकात हे दगड मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आणण्यात आले होते. मरिन ड्राइव्हरील या टेट्रापॉडची एकूण संख्या साडेसहा हजारहून अधिक आहे. (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsमरीन ड्राईव्हMarine DriveमुंबईMumbaiमुंबई न्यूजMumbai News

Web Title: Why are there stones at the mumbai marine drive heres the reason why they are there pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.