Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. do you know why do doctors wear green or blue clothes during while performing surgery pdb

ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे का घालतात माहितेय का? ‘हे’ आहे यामागील खरं कारण

पूर्वी सर्जरी करताना डॉक्टर्स पांढरे कपडे वापरत असत. पण आता मात्र, ते हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे का घालतात, जाणून घ्या कारण…

August 13, 2023 13:44 IST
Follow Us
हॉस्पिटलमधील डॉक्टर्स अनेकदा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. 
कपडे तर कुठल्याही रंगाचे घालता येतील पण फक्त या दोनच रंगाचे कपडे का घातले जातात. यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
खरंतर पूर्वी ऑपरेशन करताना डॉक्टर पांढऱ्या कपड्यातच असायचे.
परंतु १९१४ मध्ये एका डॉक्टरने तो बदलून हिरवा केला. तेव्हापासून हा ड्रेस लोकप्रिय झाला. आजकाल काही डॉक्टर निळ्या रंगाचे कपडेही घालतात.
ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या रंगाचे कपडे घालतात कारण एका रिपोर्टनुसार, शस्त्रक्रियेदरम्यान हिरव्या कपड्यामुळे डोळ्यांना थोडा आराम मिळतो. 
शस्त्रकिया करताना बारकाईने लक्ष असणं गरजेचं असतं. ऑपरेशन दरम्यान डोळे उघडे ठेवावे लागतात, ज्यामुळे डोळे थकतात, जर हिरवा रंग त्वरित दिसला तर डोळे थंड होतात. हिरवा रंग बघून तणाव दूर होतो.
शस्त्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणावर रक्त बाहेर येतं. रक्ताचा लाल रंग निळ्यावर उठून दिसतो. परंतु त्याचा प्रभाव मात्र जाणवत नाही. निळ्यावर लाल रंग पाहिल्याच मेंदूला फारसं विचित्र वाटत नाही. त्यामुळे रंग शास्त्राचा विचार करूनच ऑपरेशन करताना डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे घालतात.
वैज्ञानिक भाषेत याला ‘व्हिज्युअल इल्युजन’ म्हणतात. खरंतर पांढऱ्या प्रकाशात इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतात. लाल रंगाच्या प्रभावामुळे डोळ्यांना पांढऱ्या पृष्ठभागावरूनही हिरवा रंग दिसण्याचा भास होतो. 
जेव्हा डॉक्टर रुग्णाच्या लाल रंगाकडे पाहून त्याच्या स्टाफने आधीच घातलेल्या हिरव्या किंवा निळ्या रंगाकडे बघेल तेव्हा हिरव्या रंगाचा भ्रम त्यात लगेच मिक्स होईल आणि त्यामुळे कोणताही व्हिज्युअल डिस्टरब्रँस होणार नाही. (फोटो सौजन्य : freepik)
TOPICS
ट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsडॉक्टरDoctorव्हायरल न्यूजViral News

Web Title: Do you know why do doctors wear green or blue clothes during while performing surgery pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.