-
भारताचे चांद्रयान-३ वेगाने चंद्राच्या दिशेने जात आहे. अशा परिस्थितीत चंद्रावरील जीवसृष्टीची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यात चंद्रावर जीवसृष्टी असण्याच्या शक्यतांनीही जोर धरला आहे. पण याआधीच असे अनेक लोक आहेत ज्यांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, चंद्रावरील जमिनीचा मालक कोण आहे आणि त्याची रजिस्ट्री कुठे केली जाते? जाणून घेऊ याची उत्तरं….
-
Outer Space Treaty 1967 नुसार, कोणत्याही देशाचा किंवा व्यक्तीचा अंतराळात किंवा चंद्रावर किंवा इतर ग्रहांवर हक्क गाजवण्याचा अधिकार नाही. कोणत्याही देशाने चंद्रावर आपला ध्वज लावला असेल, परंतु कोणीही त्याचा मालक होऊ शकत नाही.
-
आंतरराष्ट्रीय अवकाश कायद्याच्या आधारे चंद्रावर जमीन खरेदी करणे कायदेशीररित्या वैध नाही. परंतु तरीही काही कंपन्यांचा असा दावा आहे की ‘कायदा (ट्रीटी) देशांना हक्क सांगण्यापासून प्रतिबंधित करते पण नागरिकांना नाही. म्हणूनच वैयक्तिकरित्या कोणतीही व्यक्ती कायदेशीररित्या चंद्रावर जमीन खरेदी करू शकते.
-
चंद्रावर कदाचित दुसरे जग असेल, पण त्याची रजिस्ट्री पृथ्वीवरच केली जाते. Lunarregistry.com चंद्रावर जमीन खरेदीसाठी रजिस्ट्री करुन घेते. पण या वेबसाईटनेही आपल्या FAQs सेक्शनमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, ते चंद्रावरील जमिनीचे मालक नाहीत. त्यांचे काम फक्त रजिस्ट्री करुन घेण्याचे आहे, जमीन विकण्याचे नाही. अशाप्रकारे चंद्रावरील जमीन नोंदणीकृत झाल्यास मालकी हक्काबाबत कोणतीही व्यक्ती न्यायालयात प्रश्न उपस्थित करू शकते
-
बॉलिवूडचा किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख खान चंद्रावरील जमिनीच्या तुकड्याचा मालक आहे. ही जमीन त्याने स्वत: विकत घेतली नसून एका ऑस्ट्रेलियन महिला चाहत्याकडून गिफ्ट देण्यात आली आहे.
-
चंद्रावर जमीन खरेदी करणाऱ्यांच्या यादीत शाहरुख खाननंतर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नाव सामील आहे.
-
यानंतर शेअर बाजारातील व्यापारी आणि टेक्निकल अनालिस्ट राजीव बागडी, बंगळुरुमधील व्यवसाय विश्लेषक म्हणून काम करणारे ललित मेहता.
-
ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील निवासी साजन, गुजरातचे व्यापारी विजय कथेरिया, धर्मेंद्र अनीजा, गौरव गुप्ता इत्यादी अनेक भारतीय आहेत ज्यांनी चंद्रावर जमिनीचा तुकडा विकत घेतला आहे. अशाप्रकारे अनेक भारतीयांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. (सर्व फोटो – pexels, Twitter.com/Space_Statio आणि लोकसत्ता वेबसाईटवरील)
चंद्रावर आत्तापर्यंत ‘या’ भारतीयांनी खरेदी केली जमीन; पण चंद्रावरील जमिनीचा खरा मालक कोण, त्याची रजिस्ट्री कुठे होते? जाणून घ्या
भारताच्या चांद्रयानाप्रमाणेच इतर अनेक देश चंद्राचा अभ्यास करत आहेत. अलीकडेच, रशियाचे लुना-25 देखील चंद्रावर पाठवण्यात आले होते. वृत्तानुसार, चांद्रयानापूर्वी त्याचे लँडिंग होऊ शकते.
Web Title: India chandrayaan 3 moon mission do you know who sells the land of lunar who is the owner and where is its registry sjr