-
भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांनी तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. ब्रिटिश नागरिक असलेल्या ट्रिनासह त्यांनी विवाह केला आहे. हरिश साळवे आणि ट्रिना यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
हरिश साळवेंच्या लग्न सोहळ्याला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानी, आयपीएलचा माजी आयुक्त आणि सध्या भारतातून फरार असलेला आरोपी ललित मोदी, उज्वला राऊत यांच्यासह अनेक प्रतिष्ठितांची उपस्थिती होती.
-
हरिश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मीनाक्षी होतं. ३८ वर्षांच्या संसारानंतर हरिश साळवे यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर २०२० मध्ये ब्रिटिश महिला कॅरोलिन हिच्याशी हरीश साळवे विवाहबद्ध झाले होते. परंतु, या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.
-
कॅरोलिनशी घटस्फोट घेतल्यानंतर हरिश साळवे यांनी आता तिसरं लग्न केलं आहे. त्यांचा हा विवाहसोहळा लंडनमध्ये पार पडला.
-
६८ वर्षीय हरिश साळवे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करतात. देशातल्या हायप्रोफाईल खटल्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात हरिश साळवेंनी बाजू मांडली आहे. टाटा समूहाचेही ते वकील आहेत. तसंच अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही त्यांनी सलमान खानची बाजू मांडली होती.
-
नोव्हेंबर १९९९ ते २००२ पर्यंत भारताचे सॉलिसिटर म्हणून हरीश साळवे कार्यरत होते. त्यानंतर हरीश साळवे यांची वेल्स आणि इंग्लंडच्या न्यायालयांमध्ये वकील नियुक्ती म्हणून करण्यात आली होती.
-
हरिश साळवे हे भारतातले सगळ्यात महागडे वकील म्हणून प्रसिद्ध आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ या धोरणासाठी एक समिती गठित केली आहे. हरिश साळवे या समितीचे सदस्य आहेत.
-
इंडियन प्रीमियर लीगचे माजी आयुक्त ललित मोदी हे हरिश साळवे यांच्या लग्नाला उपस्थित होते.
-
लग्नाला उपस्थित असलेल्या दिग्गजांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानी आणि उज्वला राऊत यांचाही समावेश आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया/जनसत्ता)
Photos : ६८ व्या वर्षी हरिश साळवे तिसऱ्यांदा बोहल्यावर, ललित मोदींपासून नीता अंबानींपर्यंत ‘या’ दिग्गजांची लग्नाला हजेरी
भारतातले सर्वात महागडे वकील म्हणून ओळखले जाणारे हरिश साळवे यांनी ब्रिटिश नागरिक असलेल्या ट्रिनासह बांधली लगीनगाठ.
Web Title: Harish salve ties knot for third in london nita ambani lalit modi among guests asc