Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. morocco earthquake more than 2000 people killed damages historic landmarks asc

Photos : मोरोक्कोत भूकंपाने हाहाकार, दोन हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी, शेकडो घरं कोसळली

मोरोक्कोच्या सैन्याने विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात केले आणि आपत्कालीन सेवांनी सर्वात कठीण भागात मदतीचे प्रयत्न केले, परंतु भूकंपाच्या केंद्राभोवतीच्या पर्वतीय प्रदेशाकडे जाणारे रस्ते वाहनांनी जाम झाले आणि खडक पडून अडवले.

September 10, 2023 19:48 IST
Follow Us
  • Morocco earthquake
    1/11

    मोरोक्कोमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या माराकेशला शुक्रवारी रात्री शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. यात आतापर्यंत दोन हजाराहून अधिक नागरिक ठार झाले असून, अ‍ॅटलास पर्वतराजीतील खेड्यांपासून माराकेशच्या ऐतिहासिक शहरापर्यंत अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.(PC : AP)

  • 2/11

    ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या दुर्गम भागात पोहोचण्याचे प्रयत्न बचावकार्यातील स्वयंसेवक करत असून, भूकंपबळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. (PC : AP)

  • 3/11

    गेल्या ६० वर्षांत मोरोक्कोने असा भूकंप पाहिलेला नाही. (PC : AP)

  • 4/11

    या भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेशच्या दक्षिणेस सुमारे ७० किलोमीटर अंतरावर अल हौझ प्रांतातील इघिल शहराजवळ होता. (PC : AP)

  • 5/11

    भूकंपामुळे जागे झालेले लोक भीतीने रस्त्यांवर धावू लागले. त्यानंतर उशिरा रात्री माराकेशच्या रस्त्यांवर अनेक जण गोळा झाले असून, अद्यापही अस्थिर असलेल्या इमारतींच्या आत जाण्यास घाबरत आहेत, अशी दृश्ये सरकारी दूरचित्रवाहिनीने दाखवली. (PC : AP)

  • 6/11

    माराकेशमधील बाराव्या शतकात बांधल्या गेलेल्या प्रसिद्ध कौतोबिया मशिदीचे नुकसान झाले आहे, मात्र त्याचे प्रमाण किती हे अद्याप कळू शकले नाही. (PC : AP)

  • 7/11

    मोरोक्कन लोकांनी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या जुन्या शहराभोवती असलेल्या प्रसिद्ध लाल भिंतींच्या काही भागांचे नुकसान दर्शविणारे व्हिडिओ देखील पोस्ट केले.(PC : AP)

  • 8/11

    मोरोक्कोचे राजा मोहम्मद (सहावे) यांनी सशस्त्र दलांना मदतीसाठी पाचारण केलं आहे. (PC : AP)

  • 9/11

    प्रामुख्याने माराकेशमध्ये आणि भूकंप केंद्राजवळील पाच प्रांतांमध्ये किमान दोन हजार लोक मरण पावले असून, एक हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे मोरोक्कोच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले. जखमींपैकी बहुतांश नागरिकांची जणांची प्रकृती गंभीर आहे. (PC : AP)

  • 10/11

    इमारतींच्या ढिगाऱ्याखाली कुणी जिवंत आहे काय याचा आकस्मिक सेवेचे कर्मचारी शोध घेत आहेत. (PC : AP)

  • 11/11

    बचावपथकांनी बचावकार्य हाती घेतलं असून, यासाठी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांचं सहकार्य मिळत आहे. (PC : AP)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational NewsभूकंपEarthquake

Web Title: Morocco earthquake more than 2000 people killed damages historic landmarks asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.