• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. supreme court lawyer siddharth shinde on shivsena political dispute and election commission dhanushyaban rmm

“सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाविरुद्ध निर्णय देऊ शकतं”, शिवसेना सत्तासंघर्षावर वकिलाचं मोठं भाष्य

सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलानं शिवसेना सत्तासंघर्षावर मोठं भाष्य केलं आहे.

September 18, 2023 17:51 IST
Follow Us
  • शिवसेनेत फूट पडून जवळपास दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्याप शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे.
    1/12

    शिवसेनेत फूट पडून जवळपास दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्याप शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे.

  • 2/12

    १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निर्णय दिला आहे. संबंधित निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं.

  • 3/12

    सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशानंतरही विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

  • 4/12

    यामुळे ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभु यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी पार पडली.

  • 5/12

    दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्याच्या आत १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

  • 6/12

    या सर्व घडामोडींदरम्यान, सर्वोच्च न्यायलयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांना अजूनही पक्षनाव आणि चिन्ह मिळू शकतं, असं सूचक विधान वकील सिद्धार्थ शिंदे यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

  • 7/12

    फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली- वकील सिद्धार्थ शिंदे

  • 8/12

    उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात जाणं अपेक्षित होतं, पण ते थेट सर्वोच्च न्यायालयात आले. न्यायालयाने त्यांची दखल घेतली पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही-वकील सिद्धार्थ शिंदे

  • 9/12

    आता त्यावरील कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या विरुद्धही निर्णय देऊ शकतं-वकील सिद्धार्थ शिंदे

  • 10/12

    अजूनही पक्ष आणि पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना मिळू शकतं. यावर सर्वोच्च न्यायालय विश्लेषण करून निर्णय देईल-वकील सिद्धार्थ शिंदे

  • 11/12

    हे प्रकरण कधी ऐकलं जाईल? आणि कधी निर्णय येईल? याची वेळ मर्यादा आपल्याला सांगता येणार नाही,अशी सूचक प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeनिवडणूक आयोगElection Commissionन्यायमूर्ती डी वाय चंद्रचूडJustice DY Chandrachudराहुल नार्वेकरRahul NarwekarशिवसेनाShiv Senaसर्वोच्च न्यायालयSupreme Court

Web Title: Supreme court lawyer siddharth shinde on shivsena political dispute and election commission dhanushyaban rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.