-
बुलेट गाडीची तरुणांमध्ये क्रेझ आहे. देशात बुलेट वापरणाऱ्या तरुणांची संख्याही वाढते आहे.
-
बुलेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. तरुणांची या बाईकमध्ये वेगळीच क्रेझ आहे. ही क्रेझ पाहूनच कंपनीने नवीन बुलेट देशात दाखल केलीये.
-
कंपनीने ‘New-Gen Royal Enfield Bullet 350’ लाँच केली आहे. २०२३ रॉयल एनफील्ड बुलेट 350 लाइनअप कंपनीने तीन प्रकारांमध्ये ऑफर केली आहे.
-
नवीन बुलेटला नवीन जे सीरीज इंजिन, ३४९ सीसी सिंगल सिलेंडर, एअर/ऑइल कूल्ड इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससह मिळेल. हे ६,१००rpm वर २०.२bhp आणि ४,०००rpm वर २७Nm टॉर्क जनरेट करते.
-
सध्याची बुलेट 350 ही रॉयल एनफिल्डची या जुन्या UCE इंजिनसह येणारी शेवटची बाईक आहे.
-
या बाईकमध्ये किरकोळ डिझाईन बदल करण्यात आला आहे. तसेच नवीन बुलेटमध्ये सिंगल-पीस सीट उपलब्ध आहे.
-
यात नवीन टेल-लॅम्प, चौकोनी आकाराचा बॅटरी बॉक्स आणि नवीन हेडलाईट डिझाईन देण्यात आलं आहे.
-
नवीन जनरेशच्या या बुलेटमध्ये नवीन गोलाकार टेललाइट आणि क्रोम बेझलसह सपाट गोल हेडलॅम्प दिसतील.
-
या बाईकची किंमत १.७४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : financialexpress )
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Royal Enfield चे नेक्स्ट जनरेशन माॅडेल देशात दाखल झाले आहे.
Web Title: Royal enfield launches new bullet 350 in india with prices starting from 1 73 lakh exshowroom bookings open pdb