• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. kolhapur vishal pinjani post after winning mr gay india 2023 competition hrc

“माझे जन्मगाव…”, ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ बनल्यावर कोल्हापूरच्या विशाल पिंजानीची पोस्ट

Vishal Pinjani : कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला ‘मिस्टर गे इंडिया २०२३’, विजयी झाल्यावर केलेली पोस्ट चर्चेत

Updated: October 7, 2023 17:17 IST
Follow Us
  • Vishal Pinjani Mr Gay India 2023
    1/15

    कोल्हापूर येथील विशाल पिंजानी यंदाचा ‘मिस्टर गे इंडिया २०२३ चा विजेता ठरला आहे.

  • 2/15

    आता तो २७ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणार्‍या ‘मिस्टर गे वर्ल्ड २०२३’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

  • 3/15

    केरळच्या अभिषेक जयदीप याने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले.

  • 4/15

     या स्पर्धेत विविध राज्यांतून २० स्पर्धक सहभागी झाले होते. 

  • 5/15

    विविध फेर्‍यांमध्ये विशाल पिंजानी आणि अभिषेक जयदीप यांनी अंतिम फेरी गाठली. 

  • 6/15

    . या दोघांनीही उत्तम सादरीकरण करत आपली सामाजिक जाणीव दाखवत, एकमेकांना चुरस दिली. 

  • 7/15

    यामध्ये विशालला ‘मिस्टर गे महाराष्ट्र’ आणि अभिषेक याला ‘मिस्टर गे केरळ’ किताब देऊन सन्मानित करण्यात आले.

  • 8/15

    “आम्ही करून दाखवलं. मिस्टर गे वर्ल्ड इंडियाचा किताब मिळाल्याने मी खरोखर भारावून गेलो आहे. हा प्रवास माझ्या पाठीशी असलेल्या अनेक लोकांच्या प्रेम, एकता आणि समर्थनाचा पुरावा आहे,” असं विशालने पोस्ट करत म्हटलं.

  • 9/15

    “सर्वात आधी मी माझे कुटुंब, माझे मित्र आणि माझ्या सहकाऱ्यांचे माझ्यावरील अतूट विश्वासाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. तुमचे प्रेमच मला प्रेरणा देते,” असं विशाल म्हणाला.

  • 10/15

    “प्रेमाबद्दल मी कोल्हापूर येथील माझ्या कुटुंबाचेही मनापासून आभार मानू इच्छितो. माझे जन्मगाव कोल्हापूर आणि आपल्या वैविध्यपूर्ण आणि सुंदर भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात, माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल आणि माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद,” असं विशाने म्हटलं.

  • 11/15

    “हा विजय केवळ माझा नाही; कोल्हापूर आणि भारतातील सर्व लहान शहरांतील लोकांचा हा विजय आहे,” असं विशाल म्हणाला.

  • 12/15

    “हे आशेचे प्रतीक आहे, प्रत्येक व्यक्तीची ओळख वैध आणि सुंदर आहे याची आठवण करून देते,” असं विशालने नमूद केलं.

  • 13/15

    “जे अजूनही आपली ओळख शोधत आहेत आणि आव्हानांना तोंड देत आहेत त्यांच्यासाठी आशेचा किरण बनणे हे माझे ध्येय आहे. तुम्ही एकटे नाहीत. तुमची ओळख व्हॅलिड आहे, तुमची ओळख सुंदर आहे आणि तुम्ही जसे आहात तसे प्रेम आणि इतरांनी स्वीकारण्यास पात्र आहात,” असं विशालने म्हटलं.

  • 14/15

    “प्रेम आणि सकारात्मकता पसरवत राहू या. एकत्र येऊन आपण असे जग निर्माण करू शकतो जिथे प्रत्येकजण आपले जीवन प्रामाणिकपणे आणि अभिमानाने जगू शकेल,” असं विशाने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • 15/15

    (सर्व फोटो – विशाल पिंजानी इन्स्टाग्राम)

TOPICS
कोल्हापूरKolhapurफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Kolhapur vishal pinjani post after winning mr gay india 2023 competition hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.