-
‘फेविकॉल किंवा फेविक्विक’चा वापर कोणतीही वस्तू चिटकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
-
बाटलीत भरलेले पांढरे फेविकॉल वस्तू सहज चिकटवते. म्हणूनच फेविकॉलच्या मजबूत जोडबद्दल बरीच चर्चा आहे.
-
पण तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या बाटलीत तो भरलेला असतो, त्या बाटलीला मात्र, तो का चिकटत नाही?
-
असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना, चला तर यामागचं काय कारण आहे जाणून घेऊया…
-
फेविकॉल किंवा कोणत्याही प्रकारचे गोंद बनवताना त्यात पॉलिमर्स केमिकल वापरले जाते. पॉलिमर्समध्ये लांब स्ट्रँड असतात.
-
फेविकॉल बनवताना अशा चिकट स्ट्रॅण्ड्सचा वापर केला जातो जे वस्तू खेचण्यास सक्षम असतील. ते बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यात पाणी मिसळले जाते.
-
ज्यामुळे ते द्रव स्वरूपात उपलब्ध होते. पाण्यामुळे ते कधीही सुकत नाही. यामुळेच ते नेहमी द्रव स्वरुपात उपलब्ध असते.
-
वास्तविक, गमची बाटली नेहमी बंद असते. बंद बाटलीत हवा पोहोचत नाही.
-
जेव्हा वापरायची असेल तेव्हा त्याचे झाकण उघडून आपण ते पुन्हा बंद करतो. यामुळे फेविकॉलमध्ये असणाऱ्या पॉलिमर्सचा हवेशी संबंध येत नाही.
-
त्यामुळे ते कायम द्रव (लिक्विड) स्वरूपात असते. त्यात असणाऱ्या पाण्यामुळेच ते बाटलीला चिकटत नाही.
-
म्हणून गमच्या बाटलीचे झाकण नेहमी बंद ठेवावे.
-
(फोटो सौजन्य : freepik )
सगळ्याच वस्तूंना चिकटवणारं फेविकॉल ज्या ट्यूबमधून मिळतं त्यालाच का चिकटत नाही? जाणून घ्या खरं कारण
बाटलीत असताना गोंद स्वतःला का चिकटत नाही…? तुम्हाला माहिती आहे का…चला तर यामागचं खरं कारण जाणून घेऊया…
Web Title: Why the substance used to stick things does not adhere to the container it is placed in pdb