• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. bachchu kadu statement on sudhir mungantiwar london visit to get back wagh nakha rmm

“…तर आपण लंडनला जाऊन वाघनखं लुटून आणू”; बच्चू कडूंचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

लंडनहून वाघनखं आणण्याबाबत बच्चू कडूंनी मिश्किल वक्तव्य केलं आहे.

October 16, 2023 12:50 IST
Follow Us
  • भाजपा नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनंख आणण्याबाबत करार करण्यासाठी इंग्लंडला गेले होते. ते वाघनखं न घेताच परत आले आहेत.
    1/18

    भाजपा नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनंख आणण्याबाबत करार करण्यासाठी इंग्लंडला गेले होते. ते वाघनखं न घेताच परत आले आहेत.

  • 2/18

    यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे.

  • 3/18

    “सुधीरभाऊ, वाघनखं आणायला गेले होते. त्यांनी वाघनखं तर आणलीच नाहीत. पण आता त्यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत”, असा टोला बच्चू कडूंनी एका कार्यक्रमात लगावला होता.

  • 4/18

    सुधीर मुनगंटीवार हे वाघनखं न घेताच परत येत आहेत. ते ५०-६० लाख रुपये खर्च करून तिथे गेले-बच्चू कडू

  • 5/18

    हे काम फोनवरूनही करता आलं असतं. मोदीजी डिलीटल इंडिया म्हणतात आणि आमचे मंत्री तिथे व्यक्तीश: जातात आणि मोकळ्या हाताने परत येतात-बच्चू कडू

  • 6/18

    सुधीरभाऊंनी असं करावं, हे चुकीचं आहे. ते मोठे देशभक्त मंत्री आहेत-बच्चू कडू

  • 7/18

    सुधीर मुनगंटीवार यांनी जाण्या-येण्यासाठी ५० लाख रुपयांचा खर्च करावा, हे मला काही आवडलं नाही-बच्चू कडू

  • 8/18

    त्यांनी वाघनखं आणली असती, तर चांगली गोष्ट होती. दोन-तीन वर्षांसाठी वाघनखं उसणे आणणे, ही त्यांच्या डोक्यातील कल्पनाही चांगली आहे-बच्चू कडू

  • 9/18

    मला वाटतंय आम्हीही तुमच्याबरोबर येतो, आपण वाघनखं लुटूनच आणू-बच्चू कडू

  • 10/18

    बच्चू कडूंच्या उपरोधिक टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं.

  • 11/18

    बच्चू कडू यांनी असं उपाहासात्मक बोलण्याची आवश्यकता नव्हती. उद्या ते आमदारकीच्या निवडणुकाही घेऊ नका, असं म्हणतील -सुधीर मुनगंटीवार

  • 12/18

    कारण आमदारकीच्या निवडणुकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. एका लोकसभेच्या निवडणुकीला २५ कोटींचा खर्च होतो-सुधीर मुनगंटीवार

  • 13/18

    त्यामुळे २० वर्षांतून एकदा निवडणुका घ्या, अशी सूचना त्यांनी केली नाही, हे बरं झालं-सुधीर मुनगंटीवार

  • 14/18

    बच्चू कडूंकडून ही अपेक्षा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक आस्था असणाऱ्या वाघनखांच्या बाबतीत त्यांनी असं भाष्य केलं असेल तर ते योग्य नाही-सुधीर मुनगंटीवार

  • 15/18

    शेवटी त्यांनाही लाखो रुपयांचा पगार जनतेनं कराच्या रुपात भरलेल्या पैशातून दिला जातो. तो पगार घेताना त्यांना असं काही वाटलं नाही-सुधीर मुनगंटीवार

  • 16/18

    उद्या अधिवेशन ऑनलाईन घेतलं तर करोडो रुपये वाचतील, अशी सूचना त्यांची कदाचित असू शकते-सुधीर मुनगंटीवार

  • 17/18
  • 18/18

    सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता

TOPICS
बच्चू कडूBachchu Kaduभारतीय जनता पार्टीBJPसुधीर मुनगंटीवारSudhir Mungantiwar

Web Title: Bachchu kadu statement on sudhir mungantiwar london visit to get back wagh nakha rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.