-
भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे जी रोखणे अशक्य आहे. यासाठी सावधगिरी आणि दक्षता हाच उपाय आहे. नैसर्गिक आपत्तींसाठी अगोदर तयार राहिल्यास भूकंपासारख्या आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानाची तीव्रता कमी करता येऊ शकते.
-
आतापर्यंत जगात अनेक मोठे भूकंप झाले आहेत, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अब्जावधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जगातील अशाच काही अत्यंत भयंकर भूकंपांविषयी जाणून घेऊया..
-
वाल्दिव्हिया, चिली
आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप चिलीतील वाल्दिव्हिया येथे झाला असून त्याची तीव्रता ९.५ इतकी नोंदवली गेली होती. या भूकंपात सुमारे १६५५ लोकांचा मृत्यू झाला होता. २२ मे १९६० रोजी झालेल्या या भूकंपामुळे हवाईमध्ये ६१, जपानमध्ये १३८ आणि फिलीपिन्समध्ये ३२ लोकांचा मृत्यू झाला होता. -
प्रिन्स विल्यम साउंड, अलास्का
दुसरा सर्वात मोठा भूकंप अमेरिकेतील अलास्का येथे झाला होता. ज्याची तीव्रता ९.२ होती. २७ मार्च १९६४ रोजी झालेल्या या भूकंपाचे धक्के सतत ३ मिनिटे जाणवले, ज्यात १२८ लोकांचा मृत्यू झाला. -
सुमात्रा
इतिहासातील तिसरा आणि सर्वात मोठा भूकंप सुमात्रा-अंदमान बेटांवर झाला, त्याची तीव्रता 9.1 इतकी होती. 26 डिसेंबर 2004 रोजी झालेल्या या भूकंपाचे धक्के भारत, श्रीलंका, थायलंडसह दक्षिण पूर्व आशियातील 10 देशांमध्ये जाणवले. या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीत ३ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. -
तोहोकू, जपान
11 मार्च 2011 रोजी जपानमधील तोहोकू येथे 9.1 तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्यामुळे त्सुनामी आली. या आपत्तीत 15,700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 4600 हून अधिक लोक बेपत्ता झाले. -
मौले, चिली
मौले, चिली येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 8.8 होती, ज्यामध्ये 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. 27 फेब्रुवारी 2010 रोजी झालेल्या या भूकंपानंतर त्सुनामी आली होती -
आसाम-तिबेट
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच १५ ऑगस्ट १९५० रोजी भारतातील आसाम आणि चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये ८.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपात भारतात सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झाला, तर दोन्ही देशांमध्ये मृतांची संख्या 4800 होती. -
नेपाळ
25 एप्रिल 2015 रोजी झालेल्या भूकंपात 8000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या भूकंपाची तीव्रता 8.1 एवढी होती. भारत, चीन, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
(फोटो स्रोत: इंडियन एक्सप्रेस)
पृथ्वी हादरली, लाखोंचा मृत्यू! जगातील सर्वात भयंकर भुकंपांची दृश्य, भारताला कधी बसला होता फटका?
World’s Most Dangerous Earthquake: आतापर्यंत जगात अनेक मोठे भूकंप झाले आहेत, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अब्जावधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जगातील अशाच काही अत्यंत भयंकर भूकंपांविषयी जाणून घेऊया..
Web Title: Earth shaken lakhs people dies world most dangerous earthquake how many earthquakes happened in india till date photos here svs