• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. kambala race bengaluru maiden coastal karnataka iehd import snk

बंगळुरूमध्ये पहिल्यांदा आयोजित केलेल्या कंबाला शर्यतीचे चित्तथरारक दृश्य, पाहा फोटो

बंगळुरू येथील पहिला कंबाला सोमवारी पहाटेपर्यंत विविध श्रेणीतील अंतिम फेरीचा समारोप होण्यापूर्वी पार पडला.

Updated: November 30, 2023 13:04 IST
Follow Us
  • Kambala race Bengaluru
    1/10

    कर्नाटकमध्ये ‘कंबाला’ हा म्हशींच्या शर्यतीचा खेळ चांगलाच प्रसिद्ध आहे. दरवर्षी या खेळाचे आयोजन केले जाते. बेंगळुरूमधील सिटी पॅलेस मैदानावर २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी यंदा आयोजन करण्यात आले होती. या शर्यतीमध्ये म्हशींच्या १६० जोड्या खास बनवलेल्या स्लश ट्रॅकवरून धावल्या. . (इंडियन एक्स्प्रेस फोटो सौजन्. – जितेंद्र एम.)

  • 2/10

    बंगळुरुमध्ये पहिल्यांदाच कंबाला शर्यत पार पडली. सोमवारी पहाटेपर्यंत विविध श्रेणीतील अंतिम फेरीचा समाना सुरू होता. (इंडियन एक्स्प्रेस फोटो सौजन्. – जितेंद्र एम.)

  • 3/10

    दक्षिण कन्नड आणि उडुपी या किनारपट्टीवरील कर्नाटक जिल्ह्यांतील १६० बैलजोड्या या शर्यतींमध्ये सहभागी झाल्या होत्या. इंडियन एक्स्प्रेस फोटो सौजन्. – जितेंद्र एम.)

  • 4/10

    केन हालगे, अड्डा हालगे, नेगीलू (वरिष्ठ आणि कनिष्ठ) आणि हग्गा (वरिष्ठ आणि कनिष्ठ) या चार गटांत या शर्यती घेण्यात आल्या. इंडियन एक्स्प्रेस फोटो सौजन्. – जितेंद्र एम.)

  • 5/10

    कंबाला हा कर्नाटकमधील एक पारंपरिक खेळ आहे ज्याचा सराव कर्नाटकच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये केला जातो, विशेषत: ज्या प्रदेशात तुलू भाषकांची संख्या जास्त आहे. इंडियन एक्स्प्रेस फोटो सौजन्. – जितेंद्र एम.)

  • 6/10

    कंबाला पाहण्यासाठी उभारलेल्या गॅलरी खचाखच भरलेल्या होत्या आणि शर्यती पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळी मोठे स्क्रीन लावण्यात आले होते.इंडियन एक्स्प्रेस फोटो सौजन्. – जितेंद्र एम.)

  • 7/10

    कंबाला स्पर्धा किंवा इतर शर्यती जिंकण्याच्या आशेने वर्षभर म्हशींच्या जोड्या पाळल्या जातात. (इंडियन एक्स्प्रेस फोटो सौजन्. – जितेंद्र एम.)

  • 8/10

    राज्याच्या राजधानीतील कंबालामध्ये अधिक संघ सहभागी झाले आहेत याची खात्री करण्यासाठी, कार्यक्रमासाठी म्हशींना बेंगळुरूला आणण्यासाठी ५०,०००रुपयांचे प्रोत्साहन देण्यात आले. इंडियन एक्स्प्रेस फोटो सौजन्. – जितेंद्र एम.)

  • 9/10

    बाला समितीकडून नोव्हेंबरपासून ते एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत दक्षिण कर्नाटक आणि उडुपी जिल्ह्यांत हा खेळ आयोजित केला जातो. कंबाला हा खेळ अनेकांसाठी प्रतिष्ठेची बाब मानली जातो.  इंडियन एक्स्प्रेस फोटो सौजन्. – जितेंद्र एम.)

  • 10/10

     या खेळात प्रथम येणाऱ्यास १.५ लाख रुपयांसह सोनंदेखील बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. या खेळात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं यासाठी म्हशींना खेळाच्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली. इंडियन एक्स्प्रेस फोटो सौजन्. – जितेंद्र एम.)

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Kambala race bengaluru maiden coastal karnataka iehd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.