-
गुगल दरवर्षी सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादी जाहीर करते. त्यात रेसिपीजसंदर्भात एक विभाग आहे. गुगलने यावर्षी देखील सर्वाधिक सर्च केलेल्या रेसिपीजची यादी जाहीर केली आहे. विशेष बाब म्हणजे गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या रेसिपीजपैकी बहुतांश रेसिपी भारतीय आहेत. त्यामुळे २०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या रेसिपीज नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊ..
-
कैरीचं लोणचं
गुगलवर सर्वात जास्त वेळा सर्च केलेल्या रेसिपीजमध्ये आंब्याचे लोणचे पहिल्या क्रमांकावर आहे. युजर्सनी कच्च्या आंब्यापासून बनवलेले लोणचे हे गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च केले. -
बीच कॉकटेल
गुगल रेसिपीजमध्ये दुस-या क्रमांकावर ‘सेक्स ऑन द बीच’ हे कॉकटेल आहे, जे समुद्र किनाऱ्यावर आवडीने प्यायले जाणारे ड्रिंक आहे. हे एक अल्कोहोलिक कॉकटेल आहे ज्यामध्ये वोडका, पीच स्नॅप्स, ऑरेंज ज्यू रस आणि क्रॅनबेरीचा ज्यूस असतो. -
पंचामृत
गुगलच्या टॉप सर्च रेसिपीजमध्ये पंचामृत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील अनेक घरांमध्ये ते देवाला अर्पण केले जाते आणि पूजेदरम्यान प्यायले जाते. हे दूध, दही, मध, तूप आणि साखर मिसळून बनवले जाते. -
हकुसाई
होकुसाई हे जपानमध्ये बनवलेले लोणचे आहे जे कोबीपासून बनवले जाते. हे देखील गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलेली चौथी रेसिपी आहे. -
कोथिंबीर पंजिरी
कोथिंबीर पंजिरी ही स्विट डिश धार्मिक विधीं दरम्यान देवदेवतांना प्रसाद म्हणून बनवली जाते. गुगलवर सर्वाधिक शोधली जाणारी ही पाचवी रेसिपी आहे. -
करंजी
महाराष्ट्रात दिवाळीनिमित्त बनवली जाणारी करंजी, गुगल रेसिपीज सर्चमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. पीठ आणि खव्यापासून बनवलेला हा गोड पदार्थाचा एक प्रकार आहे. -
तिरुवथिराई काली
तिरुवथिराई काली हा देखील एक प्रकारचा गोड पदार्थ आहे जो धार्मिक विधींदरम्यान देवदेवतांना अर्पण केला जातो. तांदूळ आणि डाळी बारीक वाटून गुळाच्या पाकात उकळून ते बनवले जाते. -
उगाडी पचडी
उगाडी पचडी हा दक्षिण भारतात उगाडीच्या सणाला फळांच्या काढणीसाठी तयार केलेला पदार्थ आहे. कच्चा कैरी, चिंच, गूळ, कडुलिंबाची फुले, मीठ आणि तिखट यांचे मिश्रण करून तो तयार केला जातो. त्याची चव आंबट-गोड-मसालेदार अशी असते. -
कोलुकट्टई
कोळुकट्टाई याला कोझुकट्टाई असेही म्हणतात. हे तांदळाचे पीठ, नारळ आणि गूळ घालून बनवले जाते. -
रवा लाडू
रवा लाडू ही गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली दहावी रेसिपी आहे. हा एक प्रकारचा गोड पदार्थ आहे जो बहुतेक दक्षिण भारतात बनवला जातो. रवा, साखर, तूप, काजू आणि मनुका एकत्र करून हा पदार्थ बनवला जातो. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स आणि फ्रीपिक)
कैरीचं लोणचं ते पंचामृत; २०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेल्या ‘या’ १० रेसिपी
10 Most trending recipes on Google in 2023 : वर्ष २०२३ मध्ये गुगलवर काही रेसिपीज सर्वाधिक सर्च केल्या गेल्या आहेत, यात बहुतांश भारतीय रेसिपीजचा समावेश आहे. या रेसिपीज कोणत्या जाणून घेऊ..
Web Title: Google year in search 2023 mango pickle to coriander panjiri these recipes were searched on google this year jshd import sjr