-
पृथ्वीचे असे काही भाग आहेत जिथे अनेक महिन्यांपर्यत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. सूर्यप्रकाश मानवासाठी खूप महत्वाचा आहे. परंतु अशा सूर्य प्रकाश पोहोचत नाही अशा ठिकाणी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विगनेला हे असेच एक गाव आहे जिथे सूर्य उगवतो पण तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. (Photo Source: @ptrckthmpsn/instagram)
-
विगनेला हे स्वित्झर्लंड आणि इटली दरम्यान वसलेले गाव आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सूर्यप्रकाश मंदावला की गावात प्रकाश येत नाही. हे गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे, त्यामुळे सूर्यप्रकाश गावात पोहोचत नाही. (Photo Source: @ptrckthmpsn/instagram)
-
सूर्यप्रकाशाचा अभाव ही या गावासाठी मोठी समस्या होती. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या गावातील लोकांनी एक जबरदस्त जुगाड करुन स्वतःचा कृत्रिम सूर्य बनवला. (Photo Source: @ptrckthmpsn/instagram)
-
गावातील एका आर्किटेक्ट आणि इंजिनीअरने ही समस्या सोडवण्याचा मार्ग शोधून काढला जेणेकरून गावाला सूर्यप्रकाश मिळू शकेल. २००६ मध्ये त्यांनी महापौरांच्या मदतीने १ लाख युरो (भारतीय चलनात ८९ लाख रुपये) जमा केले. (Photo Source: @ptrckthmpsn/instagram)
-
या पैशाच्या मदतीने त्यांनी ४० चौरस किलोमीटर काच खरेदी केली आणि ती डोंगराच्या माथ्यावर बसवली. हा १.१ टनाचा आरसा डोंगरावर ११०० मीटर उंचीवर बसवण्यात आला आहे, जेणेकरून त्यावर पडलेला सूर्यप्रकाश थेट गावाकडे परावर्तित होईल. (Photo Source: @ptrckthmpsn/instagram)
-
परंतु, हा आरसा संपूर्ण गावाला प्रकाशमान करेल एवढामोठा नव्हता, त्यामुळे त्याचा अॅंगल अशा प्रकारे सेट केला आहे की तो गावातील चर्चसमोरील भाग प्रकाशित करू शकेल. (Photo Source: @ptrckthmpsn/instagram)
-
हा आरसा संगणकाद्वारे चालवला जातो, जो दिवसभर सुर्याच्या हालचालींचे अनुसरण करतो आणि त्या दिशेने फिरत राहतो. हा आरसा दिवसातील ६ तास सूर्यप्रकाश परावर्तित करतो, ज्यामुळे गावाचा काही भाग प्रकाशमय होतो. (Photo Source: visitossola.it)
३ महिन्यांपर्यंत अंधारात असायचे ‘हे’ गाव, सुर्यप्रकाशासाठी इंजिनीअरने केला जबरदस्त जुगाड, थेट कृत्रीम सूर्यच बनवला
स्वित्झर्लंड आणि इटलीच्या मध्ये एक गाव आहे. हे गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असल्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत येथे सूर्यप्रकाश येत नाही. या समस्येला तोंड देण्यासाठी गावातील लोकांनी असा उपाय शोधून काढला की त्यांनी सूर्यप्रकाश गावाकडे वळवला.
Web Title: Italian village viganella created its own sun to light up the dark valleys jshd import jap