-
अयोध्येतील भव्य राम मंदिर जवळजवळ तयार झाले आहे. २२ जानेवारीला या मंदिरात रामलल्लांच्या मुख्य मूर्तीची विधीवत पूजा करुन प्राणप्रतिष्ठा केली जाईल. मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या भगवान रामांच्या इतर मूर्तीही बनवून तयार आहेत. पश्चिम बंगालमधील एका मुस्लीम कुटुंबाने या मूर्ती तयार केल्या आहेत. .
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिरात स्थापित करण्यात येणाऱ्या अनेक मूर्ती मोहम्मद जलालुद्दीन आणि त्यांचा मुलगा बिट्टू यांनी तयार केल्या आहेत.
-
जलालुद्दीनचे कुटुंब पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील आहे. या कुटुंबाने देवी-देवतांच्या मूर्ती बनवण्यात नैपुण्य प्राप्त केले आहे.
-
जलालुद्दीन यांनी अयोध्या राम मंदिरासाठी फायबरपासून मूर्ती बनवल्या आहेत. ते म्हणतात की, फायबरपासून बनवलेल्या मूर्ती दीर्घकाळ टिकतात.
-
जलालुद्दीन सांगतात, फायबरची एक लाइफ साइज मूर्ती बनवण्यासाठी सुमारे ३ लाख रुपये खर्च आला आहे. कारण अशी एक मूर्ती बनवण्यासाठी ३० ते ३५ लोकांच्या मेहनतीची गरज लागते.
-
बंगालमध्ये दरवर्षी दुर्गापूजेच्या वेळीही जलालुद्दीन माँ दुर्गेच्या मोठ्या मूर्ती बनवतात.
-
दरम्याम २२ जानेवारी रोजी अयोध्येतील नव्याने बांधलेल्या राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे. हा कार्यक्रम अविस्मरणीय आणि भव्य होण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
Ayodhya Ram Mandir: ‘या’ मुस्लीम कुटुंबाच्या हातून घडल्या रामलल्लांच्या मूर्ती, अयोध्येच्या मंदिरात होणार स्थापना
Ram Mandir : मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिरात स्थापित करण्यात येणाऱ्या अनेक मूर्ती मोहम्मद जलालुद्दीन आणि त्यांचा मुलगा बिट्टू यांनी तयार केल्या आहेत.
Web Title: Ayodhya ram mandir muslim family of west bengal create lord rama idol for ram mandir jshd import sjr