-   नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये मोसमातील पहिला आंबा दाखल झाला आहे. 
-  रत्नागिरीतून आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत 
-  पहिल्या आंब्याच्या पेट्यांची पूजा करण्यात आली आहे. 
-  डॉ. सुनील सुर्वे व पुष्कर सुर्वे यांच्या पावस येथील बागेतून हे आंबे नवी मुंबईत आले आहेत 
-  यंदाच्या मोसमात आंब्याचे उत्पादन चांगले झाले आहे, असे व्यापारी अमोल शिंदे यांनी सांगितले आहे 
-  सध्या आंब्याच्या या पेटीचा मुंबईतील दर १० ते १५ हजार रुपये इतका आहे. 
-  तर पुण्यात सुद्धा मानाच्या आंब्याची पहिली पेटी काल दाखल झाली होती. चार डझन आंब्याची पहिली पेटी लिलावात २१ हजार रुपयात विकली गेली आहे 
-  मुंबई व पुण्यातील दरांची आकडेवारी पाहता प्रत्येक फळ ४०० ते ६०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले आहे. 
Mango Price: २०२४ मधील पहिली आंब्याची पेटी मुंबई-पुण्यात दाखल, एका आंब्याचा भाव ऐकलात का?
Mango Price In Mumbai Pune 2024: जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुंबई व पुण्यात फळांचा राजा आंबा यांनी दिमाखात प्रवेश केला आहे. यंदा उत्पादन चांगलं झाल्याने प्रत्येक फळाची किंमत साधारण किती आहे, पाहूया..
Web Title: First mango of the 2024 reached apmc navi mumbai and pune check prices of mango this year one piece of aam at 400 rupees svs