Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. budget 2024 nirmala sitharaman blue saree details ram connection hidden meaning of color of finance minister sarees since 2019 svs

Budget 2024: निर्मला सीतारमण यांच्या साडीचं ‘राम’ नातं! २०१९ पासून बजेटसाठी नेसलेल्या साड्यांचे ‘हे’ अर्थ माहित आहेत का?

Nirmala Sitharaman Saree Meaning: निर्मला सीतारमण यांच्या साडीची विशेष चर्चा आहे. मागील पाच अर्थसंकल्पांमधील सीतारमण यांच्या साड्यांविषयी तसेच त्यांच्या रंगांमागील अर्थाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

February 1, 2024 13:04 IST
Follow Us
  • Budget 2024 Nirmala Sitharaman Blue Saree Details Ram Connection Hidden Meaning Of Color Of Finance Minister Sarees Since 2019
    1/9

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज १ फेब्रुवारी २०२४ ला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकांपूर्वीचा हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरला

  • 2/9

    यंदा सुद्धा निर्मला सीतारमण यांच्या साडीची विशेष चर्चा आहे. मागील पाच अर्थसंकल्पांमधील सीतारमण यांच्या साड्यांविषयी तसेच त्यांच्या रंगांमागील अर्थाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

  • 3/9

    २०१९ मध्ये भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगलगिरी गुलाबी साडी नेसून अर्थसंकल्प सादर केला होता. गुलाबी रंग हा स्थैर्य व सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.

  • 4/9

    २०२० मध्ये निर्मला सीतारमण यांनी तेजस्वी पिवळी सिल्क साडी नेसून अर्थसंकल्प सादर केला होता, पिवळा रंग हा उत्साह व ऊर्जेचे प्रतीक मानला जातो.

  • 5/9

    २०२१ मधील निर्मला सीतारमण यांची पोचमपल्ली साडी लाल रंगाची होती व त्याला क्रीम रंगाचा काठ होता. लाल रंग हा वर्षानुवर्षे शक्ती व संकल्पाचा रंग मानला गेला आहे. तसेच या रंगाला गांभीर्याची झालर आहे असेही म्हटले जाते

  • 6/9

    २०२२ ला अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी ब्राऊन (तपकिरी) रंगाची बोमकाई साडी नेसली होती. हा मातीचा रंग असल्याने त्याला सर्वसमावेशक व व्यापक मानले जाते. तसेच हा सुरक्षेचा रंग म्हणून सुद्धा ओळखला जातो.

  • 7/9

    २०२३ या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लाल व काळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती जो शौर्य व शक्तीचे प्रतीक आहे. काळा रंग हा काहीसा बंडखोरीचा सुद्धा मानला जातो पण सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास बंधने मोडण्याची शक्ती असलेला हा रंग मानला जातो.

  • 8/9

    तर चालू वर्ष २०२४ मध्ये निर्मला सीतारमण यांनी निळ्या मोरपिशी रंगाची पानांच्या प्रिंटची साडी नेसली आहे. निळा रंग हा शांती, स्थैर्य, प्रेरणा व ज्ञानाचा मानला जातो.

  • 9/9

    २०२४ मध्ये अर्थसंकल्पासाठी सीतारमण यांनी नेसलेल्या साडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तुतीच्या सिल्कमधील बंगाल कांथा साडीचा रंग तामिळनाडूमध्ये रामर (श्री राम) निळा म्हणून ओळखला जातो.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025)Budget 2025निर्मला सीतारमणNirmala Sitharamanमराठी बातम्याMarathi News

Web Title: Budget 2024 nirmala sitharaman blue saree details ram connection hidden meaning of color of finance minister sarees since 2019 svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.