Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. gobi manchurian banned in goa how was this indian chinese food prepared know the history of gobi manchurian snk

गोव्यात बंदी घातलेल्या कोबी मंच्युरिअनची निर्मिती कुठे झाली?भारतीय-चायनीज खाद्यपदार्थाचा इतिहास जाणून घ्या

Why Gobi Manchurian Ban in Goa : सध्या कोबी मंच्युरिअन बनवताना सिंथेटिक रंगांचा वापर आणि अस्वच्छतेच्या कारणांमुळे गोव्यात बंदी घालण्यात आली आहे

Updated: February 8, 2024 00:30 IST
Follow Us
  •  How Was This Indian Chinese Food Prepared Know The History Of Gobi Manchurian
    1/12

    Gobi Manchurian Banned in Goa: भारतात अनेकांना कोबी मंच्युरिअन खायला आवडते. पण, सध्या कोबी मंच्युरिअन बनवताना सिंथेटिक रंगांचा वापर आणि अस्वच्छतेच्या कारणांमुळे गोव्यात बंदी घालण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Freepik)

  • 2/12

    पण, हा पदार्थ नक्की चायनीज आहे की भारतीय असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग, कोबी मंच्युरिअनचा इतिहास जाणून घेऊया..

  • 3/12

    भारतातील शहरांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थांची लोकप्रियता कमी होत असून भारतीय-चायनीज खाद्यपदार्थांची लोकप्रियता वाढत आहे. प्रत्येक चौकात, रस्त्याच्या कडेला चायनीज स्टॉल लागलेले दिसतात. (फोटो सौजन्य – pixahive)

  • 4/12

    अशा स्टॉलवर चायनीज खाद्यपदार्थ भारतीय लोकांना आवडेल अशा स्वरूपात तयार केले जातात. लोकांना त्याची चवही आवडते आणि काहीतरी वेगळे खायला मिळते. कोबी मंच्युरिअनदेखील अशाच पद्धतीने तयार झालेला एक पदार्थ आहे. (फोटो सौजन्य – pixahive)

  • 5/12

    भारत आणि चीन या दोन्ही देशांतील खाद्यसंस्कृतीच्या मिश्रणातून हा पदार्थ तयार झाला आहे. भारतीय लोकांना मसालेदार पदार्थ आवडतात, तर चिनी लोकांना सोया सॉस आणि व्हिनेगरसारखे मसाले टाकून तयार केलेले पदार्थ खायला आवडतात. ((फोटो सौजन्य – pexels)

  • 6/12

    या दोन्ही पद्धतींचे मिश्रण कोबी मंच्युरिअनच्या पाककृतीमध्ये दिसते. फुलकोबीचे तुकडे कॉर्नफ्लोरच्या पीठात बुडवून तळले जातात आणि त्यानंतर तिखट टाकून आणि सोया सॉस आणि व्हिनेगर टाकून परतले जातात.  (फोटो सौजन्य – Freepik)

  • 7/12

    कोबी मंच्युरिअनमध्ये भारतीय आणि चायनीज दोन्ही चवींचा आस्वाद घेता येतो, त्यामुळेच या पदार्थाला अल्पावधीत भरपूर लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो सौजन्य – युट्यूब, Your Food Lab)

  • 8/12

    आशियाई रेस्टॉरंट पुरस्कार या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, “कोबी मंच्युरिअनचा उगम भारतातील रस्त्यावरील स्टॉल्सवर झाला आहे. १९७०च्या दशकात कोलकाता येथे जन्मलेल्या चायनीज वंशाचा नेल्सन वांग हा रेस्टॉरंट क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये स्वयंपाक करत असे.  (फोटो सौजन्य – युट्यूब, Your Food Lab)

  • 9/12

    जेव्हा एका ग्राहकाने मेनूमध्ये जे काही दिले जात होते त्यापेक्षा वेगळ्या पदार्थाची विनंती केली, तेव्हा चिकन मंच्युरिअनचा जन्म झाला. या तरुण शेफने चिकनचे तुकडे कॉर्नफ्लोअरच्या पीठात बूडवले आणि तळले. त्यानंतर त्याने चिकनचे तुकडे एका तपकिरी ग्रेव्हीमध्ये टाकले ज्यात कांदे, आले, लसूण आणि हिरव्या मिरचीसह व्हिनेगर, सोया सॉस आणि कॉर्न-स्टार्च एकत्र केले होते. (फोटो सौजन्य – युट्यूब, Your Food Lab)

  • 10/12

     एका दशकापेक्षा कमी कालावधीत, चिकन मंच्युरियन भारतीय-चायनीज खाद्यपदार्थ म्हणून उदयाला आले. लोकांना हा पदार्थ खूप आवडला. लवकरच मंच्युरियन हा शब्द कोबी (फुलकोबी) आणि पनीरलासह जोडला गेला. टोमॅटो, कोथिंबीर आणि अगदी गरम मसाल्यांनी मंच्युरियन सॉसने त्याची चव वाढवली. (फोटो सौजन्य – युट्यूब, Your Food Lab)

  • 11/12

    जेव्हा वांगने मुंबईत चायना गार्डन हे रेस्टॉरंट उघडले होते तेव्हा चिकन मंच्युरिअनला पसंती मिळत होती. पण, जेव्हा लोक शाकाहारी मंच्युरिअनची मागणी करू लागले तेव्हा पदार्थामध्ये फुलकोबीचा समावेश झाला. बारीक केलेले कांदे आणि लालसर-तपकिरी सॉस हे कोबी मंच्युरिअनचे वैशिष्ट्य आहे. जे नूडल्स किंवा फ्राईड राईस किंवा सूपसह खाल्ले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – युट्यूब, Your Food Lab)

  • 12/12

    वांग व्यतिरिक्त इतर स्थलांतरित चिनीदेखील कोलकाता येथे स्थायिक झाले आणि हे शहर भारतीय-चिनी समुदायाचे केंद्र बनले. हा समुदाय आज लहान आहे, पण त्याचा वारसा त्याच्या पाककृतीच्या रूपाने अजूनही अस्तित्वात आहे. भारतातील बहुतेक चायनीज रेस्टॉरंट्समध्ये फक्त भारतीय-चायनीज खाद्यपदार्थ असतातच, पण आता इतर देशांमध्येही हे पदार्थ विकले जातात. (फोटो सौजन्य – युट्यूब, Your Food Lab)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Gobi manchurian banned in goa how was this indian chinese food prepared know the history of gobi manchurian snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.