-
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या कारकर्दीत मोठे यश मिळवले आहे.
-
उत्कृष्ट वेगवान गोलंदाजीसाठी या खेळाडूला ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ असे नावही देण्यामध्ये आले होते.
-
आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरच्या जीवनात पुन्हा एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे.
-
शोएब अख्तर आणि पत्नी रुबाब खान यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
-
1 मार्च 2024 ला शोएब अख्तर आणि पत्नी रुबाब खान यांनी आपल्या तिसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे.
-
शोएब अख्तर वयाच्या 48 व्या वर्षी बाबा झाला आहे. त्याने नआपल्या मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त केला आहे.
-
शोएब अख्तरने आपल्या मुलीच्या सुंदर फोटोसह ही गोड बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
-
ही पोस्ट पाहून चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
या आनंदाच्या प्रसंगी शोएबने कॅप्शनमध्ये लिहले, “मिकेल आणि मुजद्दादला आता एक लहान बहीण आहे. देवाने आम्हाला मुलगी दिली आहे. आम्ही आमच्या कुटुंबात नूर अली अख्तरचे स्वागत करतो. तिचा जन्म 1 मार्च 2024 रोजी झाला आहे. तुमच्या सर्व प्रार्थनांसाठी मी आभारी आहे.”
-
या जोडप्याला मोहम्मद मिकेल अली आणि मोहम्मद मुजद्दाद अली अशी दोन मुलं आहेत. २०१६ मध्ये शोएब अख्तरचा पहिला मुलगा मिकाईलचा जन्म झाला होता.
-
तर मोहम्मद तशतदादचा जन्म 2019 मध्ये झाला आणि आता पुनः एकदा त्यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
-
शोएब अख्तरने रुबाब खानसोबत 2014 मध्ये लग्न केले होते.
-
(सर्व फोटो- शोएब अख्तर/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानी क्रिकेटपटू ४८व्या वर्षी पुन्हा एकदा झाला बाबा! सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत म्हणाला, “अल्लाहने आम्हाला…”
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या कारकर्दीत मोठे यश मिळवले आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरच्या जीवनात पुन्हा एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे.
Web Title: Pakistani cricketer became a father again at the age of 48 shares a emotional post on social media arg 02