• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. indian railway was built with elephant help interesting facts about indian railway gk longest train in india nagpur diamond crossing svs

भारतीय रेल्वेला हत्तींनी केलेली मदत माहित आहे का? डायमंड क्रॉसिंग ते सर्वात मोठी ट्रेन, ‘या’ ९ गोष्टी ठाऊक हव्याच!

Indian Railway GK Facts: भारतीय रेल्वेच्या विस्तृत झाल्याप्रमाणे इतिहास सुद्धा मोठा आहे. यातील अनेक गोष्टी अजूनही पडद्याआड आहेत. आज आपण या पोस्टच्या माध्यमातून भारतीय रेल्वेबाबत काही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

March 7, 2024 19:02 IST
Follow Us
  • Indian Railway Was Built With Elephant Help Interesting Facts About Indian Railway GK Longest Train in India Nagpur Diamond Crossing
    1/9

    Indian Railways Surprising Facts: लाखोंचे कुटूंब पोसणारी, कोट्यवधी नागरिकांच्या स्वप्नांची सुरुवात असणाऱ्या भारतीय रेल्वेचा इतिहास अत्यंत रंजक आहे. यातील अनेक गोष्टी तर अजूनही पडद्याआड आहेत. आज आपण या पोस्टच्या माध्यमातून भारतीय रेल्वेबाबत काही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    भारतीय रेल्वेमध्ये तब्बल १.३ मिलियन म्हणजे १३ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. इतक्या मोठ्या संख्येत रोजगार उपलब्ध करून देणारी ही महत्त्वाची सरकारी यंत्रणा आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9

    भारतीय रेल्वेची सुरुवात मानले जाणारे वाफेचे इंजिन कोळश्याचा वापर करून चालवले गेले होते. कोळसा हा अधिक वेळ जळत राहतो आणि त्याला मध्ये मध्ये पाणी टाकून भिजवल्याने मोठ्या प्रमाणात वाफ तयार व्हायची. अनेक प्रदर्शनांमध्ये सुद्धा कोळश्यावर चालणाऱ्या वाफेच्या इंजिनाचे फोटो दाखवले जातात. (फोटो: इंडियन एक्सस्प्रेस)

  • 4/9

    कर्नाटकातील हुबळी येथील श्री सिद्धरुद्ध स्वामीजी रेल्वे स्थानकावर जगातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म बांधण्यात आले आहे. या रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी १५०७ मीटर आहे. या रेल्वे प्लॅटफॉर्मचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. हा प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी एकूण २० कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. यापूर्वी गोरखपूर जंक्शनच्या नावे हा रेकॉर्ड होता. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 5/9

    कोलकात्याच्या हावडा रेल्वे स्थानकात सर्वाधिक रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत. या स्थानकावर एकूण २३ प्लॅटफॉर्म आहेत. तर या रेल्वे स्थानकावर २६ ट्रॅकची रेल्वे लाईन टाकण्यात आली आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 6/9

    भारतीय रेल्वेच्या नागपूर स्थानकाजवळ डायमंड क्रॉसिंग आहे, याचा अर्थ या ठिकाणी चारही बाजूंनी ट्रेन येऊन थांबतात. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/9

    दिब्रुगड – कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे जी भारताचे ईशान्येकडील राज्य आसाममधील दिब्रुगढ ते भारताच्या दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूमधील कन्याकुमारी पर्यंत धावते. ही ट्रेन ४१८९ किलोमीटरचे अंतर पार करताना भारतातील नऊ राज्यांमधून प्रवास करते. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    भारतीय रेल्वेच्या स्थापनेच्या वेळी हत्तींची मोठी मदत झाली होती. पारंपरिक पद्धती अकार्यक्षम सिद्ध होत असताना जड सामान/ मशीन उचलण्यासाठी हत्तींचे बळ वापरण्यात आले होते. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 9/9

    बहुधा यामुळेच १६ एप्रिल २००२ ला एका पांढऱ्या हत्तीच्या रूपातील ‘भोलू’ ला भारतीय रेल्वेने अधिकृत मॅस्कॉट घोषित केलं एहोते. भारतीय रेल्वेला १५० वर्षं पूर्ण होण्याच्या निमित्ताने या मॅस्कॉटचे अनावरण करण्यात आले होते. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
भारतीय रेल्वेIndian Railwayमराठी बातम्याMarathi News

Web Title: Indian railway was built with elephant help interesting facts about indian railway gk longest train in india nagpur diamond crossing svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.