Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. best books to read on lord shiva jai mahakaal snk

तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर नक्की वाचा ही ५ पुस्तके

महादेव शंकरबाबत वाचण्यासाठी सर्वोत्तम पुस्तके

Updated: March 9, 2024 02:00 IST
Follow Us
    
Best Books to Read on Lord Shiv
    Best Books to Read on Lord Shiva: शिव कोण आहे? ते भगवान आहेत का? की फक्त एक एक पौराणिक कथा? शिव याचा काहीतरी अर्थ आहे जो फक्त त्यांना समजतो जो तो शोधण्याचा प्रयत्न करतो. भारतीय आध्यात्मिक संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचे देवता भगवान शिव यांच्याबद्दल अनेक कथा आणि दंतकथा आहेत. तो देव आहे की फक्त हिंदू संस्कृतीमधील एक मूर्ती आहे? शंकराला सखोल अर्थ आहे, जो सत्याचा शोध घेणाऱ्यांनाच उपलब्ध आहे? भगवान शंकराचे भक्त नेहमी त्यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आज भगवान शिवासंबधीत काही पुरस्तकांबाबत या लेखात माहिती देणार आहोत जे वाचून कदाचित तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळतील (फोटो सौजन्य फ्रिपीक)
    सनातन धर्मात भगवान शिवाची अनेक रूपात पूजा केली जाते. भगवान शिव आजही जिवंत असल्याचे मानले जाते आणि त्यांनी पृथ्वीवर अनेक अवतार घेतले आहेत, परंतु याचा कोणताही पुरावा नाही. त्यांच्याविषयी अनेक दंतकथा आमि काल्पनिक कथा सांगणारी काही पुस्तकांबाबत जाणून घेऊ या… (फोटो सौजन्य अॅमेझॉन)
    १. अमिश त्रिपाठी शिवा ट्रायलॉजी
    लेखक अमिश त्रिपाठी लिखित ‘मेलुहाचे मृत्युंजय’ हे पुस्तक भगवान शिव यांची प्रेरणा घेऊन लिहिले आहे. यामध्ये लेखकाने त्याला समजलेले भगवान शंकराचे रुप आपल्या काल्पनिक रहस्यमयी कथेत गुंफले आहे. जर एखाद्या व्यक्तीने पुस्तकाची काही पाने वाचली तर पुढील पाने वाचण्यासाठी तो खूप उत्सुक होतो. ही पुस्तके वाचताना प्रत्येक पुढच्या पानावर एक रहस्य उलगडत असल्याचा भास होतो.
    भगवान शिव मनुष्य असते तर त्यांचे जीवन कसे असले असते? हे पुस्तक शंकराच्याच्या जीवनाचे प्रदर्शन आहे आणि तुम्ही शिवभक्त असाल तर जरूर वाचावे. (फोटो सौजन्य अॅमेझॉन)
    २. देवदत्त पट्टनाईक लिखित शिवाची ७ रहस्ये
    हिंदू देवतांमध्ये शिव सर्वात लोकप्रिय आहे. विष्णू आणि ब्रह्मा यांच्यासह महादेव म्हणून ओळखले जाणारे शिव शंकर हे हिंदू देवतांचे त्रिमूर्ती मानले जातात. शिवाची अनेक रूपे: तो कैलास पर्वताच्या बर्फाळ जमिनीवर विराजमान आहे, जगाचा नाश करण्याची क्षमता असलेल्या आपल्यावर नियंत्रण ठेवणारा ब्रह्मचारी योगी आहे, तो दुसऱ्या बाजूला पत्नी आणि पुत्रांसह गृहस्थ आश्रमाचे जीवन जगत आहे. दोन्हीपैकी कोणते रुप खरे आहे? शंकराच्या कपाळावर तिसरा डोळा, गळ्यात नाग, डोक्यावरील चंद्र, डोक्यावरून वाहणारी गंगा आणि हातात त्रिशूळ आणि डमरू – या सगळ्या प्रतीकांचा अर्थ काय आहे? त्यामागे शिवाची अनेक रूपे आणि प्रतीके दडलेली आहेत. याबाबत तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर फक्त पुस्तक वाचा. (फोटो सौजन्य अॅमेझॉन)
    ३. वेद व्यासजींचे श्री शिवपुराण
    वेद व्यास जींनी पुराणात वर्णन केले आहे की शिव – जो स्वयंभू आहे, शाश्वत आहे, परमात्मा आहे, विश्व चेतना आहे आणि ब्रह्मांडाच्या अस्तित्वाचा आधार आहे. सर्व पुराणांमध्ये शिवपुराणाला सर्वात महत्त्वाचा दर्जा आहे. यात भगवान शिवाची विविध रूपे, अवतार, ज्योतिर्लिंग, भक्त आणि भक्त यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. तुम्हाला भगवान शंकराबद्दल अधिक माहिती या पुराणातून मिळेल. हे पुस्तक नाही तर एक पुराण आहे, त्याची पूजाही होत आहे (फोटो सौजन्य अॅमेझॉन)
    ४. रणजित चौधरी यांची शिवसूत्रे
    पौराणिक कथेनुसार, भगवान शिव यांनी वसुगुप्त ऋषींना स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना एका ओढ्याजवळील एका खास पाषाणावर जाण्याची सूचना केली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ऋषी वसुगुप्त तिथे गेले तेव्हा पाषाणाला स्पर्श करता तोदगड उलटला आणि त्याच्या दगडावर शिवसूत्र कोरले गेले. ही सूत्रे भगवान शिवाच्या सूचनेनुसार कृपेसाठी पात्र असलेल्यांना प्रगट करायची केली जाता असे मानले जाते. (फोटो सौजन्य अॅमेझॉन)
    ५. ओशोंचे शिवसूत्र हिंदी
    शिवसूत्र हा सूत्रांचा संग्रह आहे, जो आपल्याला अध्यात्मिक ज्ञान शिकवतो, कदाचित भगवद्गीतेसारखी एक महाकाव्य आहे. काश्मीरमधील महादेव पर्वताजवळ इसवी सनाच्या पहिल्या शतकात वसुप्त ऋषींनी शिवसूत्राची रचना केली होती. ते म्हणाले की. काही सिद्धपुरुषांनी स्वतः भगवान शिव त्यांच्या स्वप्नात प्रकट केले आणि त्यांना सूत्रे सांगितली. काही विद्वानांचा असाही विश्वास आहे की देवाने वासुगुप्त ऋषींना एका खडकाबद्दल सांगितले ज्यावर ही सर्व सूत्रे लिहिली होती. त्या खडकाचे नाव शंकरोपाला आहे, आजही लोक त्याला भेटायला जातात. मात्र, आता ती सूत्रे त्या खडकावर दिसत नाहीत. शिवसूत्राला महेश्वर सूत्रणी असेही म्हणतात. (फोटो सौजन्य अॅमेझॉन)
TOPICS
ट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoमहाशिवरात्री २०२५Maha Shivratri 2025

Web Title: Best books to read on lord shiva jai mahakaal snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.