-
रंगांचा सण होळी जवळ आला आहे आणि लोकं वेगवेगळ्या रंगांसह रंगपंचमी साजरी करण्यासाठी सज्ज होत आहेत. देशातील विविध शहरांमध्ये दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर गन आणि फुगे विकण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी, होळी 25 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नंदुरबारमध्ये ‘भारत जोडो न्याय यात्रे’ दरम्यान आदिवासी समाजाच्या ‘होळी समारंभात’ हजेरी लावली होती. (फोटो: पीटीआय )
-
गुरुग्राममध्ये होळीच्या सणाच्या आधी अशा पद्धतीने कामगार कोरडे रंग तयार करतात. (फोटो: पीटीआय )
-
जम्मूमध्ये ‘होळी’ सणाच्या आधी विकर्त्यांनी एका दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप चिन्हासह छापलेल्या वॉटर गन विकण्यासाठी लावल्या आहेत. (फोटो : पीटीआय फोटो)
-
कोलकाता येथील मैदान परिसरात रंगपंचमीच्या उत्सवा आधीचे होळी खेळतानाचे काही फोटो. (फोटो : पीटीआय )
-
नागपुरात होळीच्या सणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुखवटे घालून विक्रेते दुकानात वॉटर गन विकतात. (फोटो : पीटीआय )
-
मथुरेजवळील बरसाना येथील श्रीजी मंदिरात लाडू होळीच्या उत्सवादरम्यान भाविक रंग खेळताना. (फोटो : पीटीआय)
-
मथुरा बरसाना येथील श्रीजी मंदिरात होळीच्या उत्सवात भक्त सहभागी होतानाचे काही फोटो आले समोर. (फोटो : पीटीआय)
-
मथुरामध्ये रंगपंचमीचे उत्सव साजरी करताना भाविक. (फोटो : पीटीआय)
Holi 2024: संपूर्ण भारतात रंगपंचमीची तयारी सुरू; फोटोंद्वारे पाहूया एक झलक !
रंगांचा सण होळी जवळ आला आहे आणि लोकं वेगवेगळ्या रंगांसह रंगपंचमी साजरी करण्यासाठी सज्ज होत आहेत. देशातील विविध शहरांमध्ये दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर गन आणि फुगे विकण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी, होळी 25 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.
Web Title: Holi 2024 preparations for rang panchami begin across india lets see a glimpse through the photos arg 02