-
उत्तर कोरिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग-उनने आपल्या नागरिकांसाठी विचित्र कायदे आणि नियम बनवले आहेत. या नियमांमध्ये उत्तर कोरिया आपल्या नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेते आणि त्यांच्यावर विचित्र कायदे लादते.(Photo:Indian Express)
-
जाऊन घेऊया उत्तर कोरियामधील नियमावलीमुळे कोणत्या गोष्टींवर बंदी आहे. (Photo:Indian Express)
-
उत्तर कोरियामध्ये परदेशी चित्रपट पाहणे किंवा परदेशी संगीत ऐकणे हा गुन्हा मानला जातो. या नियमाचे पालन नाही झाले तर उत्तर कोरियाच्या नागरिकांना कायद्यानुसार तुरुंगात कैद करतात. या नियमानुसार उत्तर कोरियामध्ये टीव्हीवर फक्त तीन चॅनेल आहेत आणि हे चॅनेल सरकारद्वारे नियंत्रित केले जातात. (Photo: Unsplash)
-
उत्तर कोरियाचे नागरिक कोणते ही आंतरराष्ट्रीय कॉल करू शकत नाहीत हा तेथे गुन्हा मानला जातो. आंतरराष्ट्रीय कॉलसह नागरिकांना कोणत्या ही प्रकारचे आंतरराष्ट्रीय संपर्क करण्याची परवानगी नाही. या नियमाचे अवहेलना झाल्यास त्या नागरिकाला फाशीची शिक्षा दिली जाते. (Photo: Unsplash)
-
देशातले सर्व पुरुष आणि स्त्रिया केवळ ठरवलेल्या २८ पैकी एक हेअरकट करू शकतात, या व्यतिरिक्त नागरिकांनी कोणत्या ही दुसऱ्या प्रकारची केस रचना करणे गुन्हा आहे. (Photo: Unsplash)
-
उत्तर कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष किम जोंग-उननुसार फक्त सर्वात यशस्वी, श्रीमंत आणि प्रभावशाली लोक उत्तर कोरियाच्या प्योंगयांग या शहरात राहू शकतात. आहेत. देशातील इतर नागरिकांनी फक्त उत्तर कोरियाच्या गावांमध्ये राहण्याची परवानगी आहे. (Photo: Unsplash)
-
उत्तर कोरियामध्ये फक्त सरकारी अधिकारी फोन, लॅपटॉप आणि इंटरनेट सेवा वापरू शकतात, याशिवाय कोणत्याही नागरिकाला फोन, लॅपटॉप आणि इंटरनेट वापरण्याची परवानगी नाही आहे. (Photo: Unsplash)
-
उत्तर कोरियामध्ये स्त्रियांना कोणत्या ही प्रकारचे मेकअप प्रोडक्टस वापरण्याची परवानगी नाही, कारण हे सर्व मेकअप प्रोडक्टस बाहेरच्या देशातून येतात आणि बाहेरून आलेले सर्व गोष्टींवर उत्तर कोरियामध्ये बंदी घातली गेली आहे. (Photo: Unsplash)
-
उत्तर कोरियाच्या कोणत्याही नागरिकाला देश सोडण्यास मनाई आहे आणि जर कोणी अधिकृत कागदपत्रांशिवाय सीमा ओलांडल्या तर त्या नागरिकाला शिक्षा म्हणून ताबडतोप गोळ्या घातल्या जातात. (Photo: Unsplash)
Photos: किम जोंग-उनच्या विचित्र नियमावलीमुळे नॉर्थ कोरियामध्ये रेड लिपस्टिकवर बंदी; ‘या’ गोष्टी वापरणेही गुन्हा, पाहा यादी
उत्तर कोरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग-उनने आपल्या नागरिकांसाठी विचित्र कायदे आणि नियम बनवले आहेत. या नियमांमध्ये उत्तर कोरिया आपल्या नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेते आणि त्यांच्यावर विचित्र कायदे लादते. जाऊन घेऊया उत्तर कोरियामधील नियमावलीमुळे कोणत्या गोष्टींवर बंदी आहे.
Web Title: Kim jong un strange rule bans red lipstick in north korea using these things is also a crime see list arg 02