• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. photos apart from chardham yatra uttarakhand has these beautiful tourist spots which you can enjoy even i n low budget arg

Photos: चारधाम शिवाय, उत्तराखंडमध्ये आहेत ही सुंदर पर्यटन स्थळं, तुम्ही कमी पैशात घेऊ शकता आनंद

चारधाम यात्रा २०२४ ची सुरुवात केदारनाथ मंदिराच्या उद्घाटनाने झाली आहे. जाणून घ्या या चारधाम यात्रेशिवाय इतर सुंदर पर्यटन स्थळे ज्यांचे तुम्ही कमी पैशात ही आनंद घेऊ शकता.

Updated: May 11, 2024 18:11 IST
Follow Us
  • chardham yatra 2024 | Kedarnath temple best places to visit near Kedarnath temple | chardham name, Chandrashila | Chopta | Agastyamuni | VasukiTal | Sonprayag | Gaurikund | chardham yatra visit places | Shankaracharya Samadhi | Yamunotri | Gangotri | Kedarnath | Badrinath
    1/10

    चारधाम यात्रा 2024 सुरु होत आहे
    चारधाम यात्रा 2024 ची सुरुवात केदारनाथच्या कपाट खुलवानने झाली आहे. हिंदू पंचागानुसार, केदारनाथ मंदिराची तिजोरी दरवर्षी अखात्रीला चारधाम यात्रेदरम्यान उघडली जाते. यंदाही हजारो भाविक केदारनाथच्या कपाट उघडण्याच्या वेळी केदारनाथ मंदिरात पोहोचले असून लाखोंच्या संख्येने या स्थानी देव दर्शनाची तयारी सुरू आहे. चारधाम यात्रेत केदारनाथ मंदिर, बद्रीनाथ मंदिर, गंगोत्री मंदिर आणि यमनोत्री मंदिराला भेट दिली जाते. (फोटो – सोशल मीडिया)

  • 2/10

    केदारनाथ मंदिर हे हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये वसलेले चारधाममधील सर्वात सुंदर आणि पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांमध्ये केदारनाथ मंदिराचा समावेश होतो. केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात मोठ्या दगडाची पूजा केली जाते. (फोटो – सोशल मीडिया)

  • 3/10

    केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात मोठ्या दगडाची पूजा केली जाते. (फोटो – सोशल मीडिया)

  • 4/10


    चंद्रशिला हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक पर्यटक स्थान आहे. चंद्रशिला ३६७९ मीटर उंचीवर आहे. चंद्रशिला हे ट्रेकिंगसाठी लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. (फोटो – सोशल मीडिया)

  • 5/10

    चोपटा हे २९०० मीटर उंचीवर वसलेले उत्तराखंडमधील एक प्रसिद्ध ट्रेकिंग स्पॉट आहे. येथे प्रसिद्ध तुंगानाथ मंदिर देखील आहे. या बर्फाच्छादित पर्वतावर ट्रेकिंग हा एक विलक्षण अनुभव आहे. (फोटो – सोशल मीडिया)

  • 6/10


    गौरीकुंड हे केदारनाथच्या पवित्र मंदिरापर्यंतच्या १४ किमीच्या ट्रेकचे महत्त्वाचे ठिकाण आहे. गौरीकुंड हे समुद्रसपाटीपासून १,९८२ मीटर उंचीवर आहे. देवी पार्वती यांच्या नावावरून या ठिकाणाला नाव देण्यात आले आहे आणि प्रसिद्ध गौरी मंदिर देखील इथे आहे. पौराणिक कथांनुसार, गौरीकुंड इथे देवी पार्वतीने भगवान शिवला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती. (फोटो – सोशल मीडिया)

  • 7/10

    सोनप्रयाग हे १८२९ मीटर उंचीवर वसलेले नयनरम्य ठिकाण आहे. सोनप्रयागचे सौंदर्य दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. हे छोटेसे गाव मंदाकिनी आणि बासुकी या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. प्रचंड बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले, हे ठिकाण अविश्वसनीय शांतता आणि आनंद देते. (फोटो – सोशल मीडिया)

  • 8/10


    वासुकीताल हे पवित्र स्थान हिमालयाच्या उंच पर्वत शिखरांनी वेढलेले आहे. वासुकी ताल हे केदारनाथमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे, जे आपल्या स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. बर्फाळ पर्वतांमध्ये ४१३५ मीटर उंचीवर वसलेल्या वासुकीतालची चढाई पर्यटकांसाठी खरोखरच अविश्वसनीय असते. (फोटो – सोशल मीडिया)

  • 9/10


    अगस्त्यमुनी हे मंदिर अगस्त्य ऋषीमुळे प्रसिद्ध आहे. प्राचीन मान्यतेनुसार अगस्त्य ऋषींनी येथे सुमारे एक वर्ष तपश्चर्या केली होती. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील या पवित्र मंदिरात बैसाखी उत्सवादरम्यान हजारो भाविकांची गर्दी होते. उंच टेकड्यांवरील हे पुरातन मंदिर स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. (फोटो – सोशल मीडिया)

  • 10/10

    भारताचे महान तत्वज्ञानी आदि शंकराचार्य यांची समाधी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आदि शंकराचार्यांनी केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. इतिहासानुसार आदि शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी भारतभर प्रवास केला. आदि शंकराचार्य केदारनाथला आले आणि त्यांनी ८व्या शतकात या पवित्र मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हिंदू धर्मातील चारधाम मठाची स्थापना केली. शंकराचार्य समाधी हे भक्तांसाठी सुंदर,निर्मळ आणि पवित्र स्थान आहे. (फोटो – सोशल मीडिया)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos apart from chardham yatra uttarakhand has these beautiful tourist spots which you can enjoy even i n low budget arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.