-
Dhruv Rathee Biography: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधी दरम्यान मोदी, गांधी व नेत्यांसह एक नाव गाजलं ते म्हणजे युट्युबर ध्रुव राठी. ‘Modi: द रिअल स्टोरी’ या मोदींवर केलेल्या टीकेच्या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली होती
-
‘Modi: द रिअल स्टोरी’ व्हिडिओला तब्बल २७ मिलियन व्ह्यूज आहेत, ध्रुव राठीच्या समर्थकांनी तर याच्या व्हिडीओमुळेचे मोदींना ४०० पारचं ध्येय लक्ष्य गाठता आलं नाही असंही म्हणून टाकलंय.
-
जर्मन शेफर्ड हे टोपणनाव असलेल्या ध्रुव राठीचा जन्म हरियाणात झाला होता. आज आपण त्याच्या विषयी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत
-
२९ वर्षीय ध्रुवने जर्मनीमध्ये शिफ्ट होण्यापूर्वी हरियाणामध्येच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते
-
ध्रुवने कार्लज़ूए इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती व त्यानंतर त्याने याच कॉलेजमधून रिन्यूएबल एनर्जी विषयात पदव्युत्तर शिक्षण सुद्धा पूर्ण केले आहे.
-
ध्रुव हा व्यवसायाने कॉन्टेन्ट क्रिएटर असून त्याचे राजकीय मुद्द्यांवरील व्हिडीओ हे बहुचर्चित असतात. तो आपल्या चॅनेलवर विश्लेषणात्मक तसेच फॅक्ट चेकिंग व्हिडीओज सुद्धा बनवतो
-
नोव्हेंबर २०२१ मध्ये ध्रुव व्हिएनामधील बेलवर्ड पॅलेसमध्ये आपली गर्लफ्रेंड ज्युली हिच्याशी लग्न केले.
-
यंदाच्या निवडणूकांच्या वेळी ध्रुवची पत्नी पाकिस्तानी असून ध्रुवचे खरे नाव सुद्धा रशीद आहे अशा खोट्या चर्चा रंगल्या होत्या. ज्युलीचे खरे नाव झुलैखा असून ध्रुव आणि ती दाऊद इब्राहिमच्या कराचीमधील बंगल्यात पाकिस्तानी लष्कराच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत राहत आहे, असाही दावा व्हायरल मेसेज करण्यात आला होता.
-
ध्रुव सध्या तरी देशातील किंवा परदेशातील कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकृत भाग नाही. (फोटो: ध्रुव राठी इन्स्टाग्राम/फेसबूक)
ध्रुव राठीची पत्नी कोण, त्याचं शिक्षण किती? ध्रुव भारतीय आहे की जर्मनीचा रहिवासी? जाणून घ्या प्रसिद्ध युट्युबरची माहिती
Dhruv Rathee Education, Wife, Political Party: ध्रुव राठीच्या शिक्षणापासून ते त्याच्या पत्नीपर्यंत अनेक फॉलोवर्सच्या मनात बहुचर्चित युट्युबरविषयी अनेक प्रश्न आहेत. आज आपण थोडक्यात याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Web Title: Dhruv rathee networth wife name is dhruv rathee indian or german which political party member is rathee modi dictator video views svs