-
जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली असून सनातन धर्मात या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
-
ओरिसातील पुरीमध्ये भगवान जगन्नाथाची ही रथयात्रा सुरू असून दरवर्षीप्रमाणे यंदाही जगन्नाथ रथयात्रेत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
-
असे म्हणतात की एकदा बहीण सुभद्राने तिचे भाऊ कृष्ण आणि बलराम यांना सांगितले की तिला शहर पाहायचे आहे. यानंतर, आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, दोन्ही भावांनी तीन रथ तयार केले.
-
त्यावर स्वार होऊन तिघे भाऊ-बहीण शहराच्या फेरफटका मारण्यासाठी निघाले आणि दौरा पूर्ण करून पुरीला परतले. अशी मान्यता आहे की ही परंपरा बाराव्या शतकात सुरू झाली.
-
पहिला रथ भगवान बलरामांचा, मधला रथ बहीण सुभद्राचा आणि मागील रथ भगवान जगन्नाथाचा आहे.
-
दरम्यान, असे म्हटले जाते की जगन्नाथ धाममध्ये एक दिवसही एक विशिष्ट काम झाले नाही तर मंदिर आपोआपच १८ वर्षे बंद होईल.
-
जगन्नाथ मंदिराचा ध्वज दररोज बदलला जातो. दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी मंदिरावरील ध्वज बदलून नवीन ध्वज लावला जातो. (ANI)
-
मंदिराची ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. मंदिराच्या घुमटावरील ध्वज बदलण्याचे काम मंदिर सेवक करत आहेत. हा ध्वज नेहमी समुद्रातून वाहणाऱ्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. (ANI)
-
पौराणिक मान्यतेनुसार जगन्नाथ पुरीत बसवलेला २० फूट त्रिकोणी ध्वज एका दिवसासाठीही बदलला नाही तर १८ वर्षे मंदिर आपोआप बंद होईल. (ANI)
-
जगन्नाथ धामचा ध्वज बदलण्याची जबाबदारी चोल कुटुंबाकडे असून ते ८०० वर्षांपासून ही परंपरा पाळत आहेत. (ANI)
-
सेवक ध्वज घेऊन साखळ्यांच्या साहाय्याने मंदिराच्या घुमटावर चढतो. त्याआधी तो खाली अग्नी प्रज्वलित करतो. मग हळूहळू तो मंदिराच्या शेवटच्या घुमटापर्यंत पोहोचतो. (पीटीआय)
-
वादळ किंवा पाऊस असला तरीही मंदिराच्या घुमटावरील ध्वज बदलण्याचा हा धार्मिक विधी रोज संध्याकाळी केला जातो. (ANI)
एक दिवसही ‘हे’ काम थांबले तर तब्बल १८ वर्ष बंद राहणार जगन्नाथ मंदिर? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
असे म्हटले जाते की जगन्नाथ धाममध्ये एक दिवसही एक विशिष्ट काम झाले नाही तर मंदिर आपोआपच १८ वर्षे बंद होईल.
Web Title: If this work in jagannath dham stops even for a day the temple will be closed for 18 years jshd import pvp