-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज म्हणजेच १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. हे लग्न किती भव्यदिव्य होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
-
या जोडप्याच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी जगभरातून अनेक सेलिब्रिटी भारतात आले होते. आणि आता या लग्नसोहळ्याला चार चाँद लावणाऱ्या लोकप्रिय नावांची यादीही समोर आली आहे.
-
किम कार्दशियन आणि तिची बहीण ख्लो कार्दशियन, जय शेट्टीपासून ते यूकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि बोरिस जॉन्सनपर्यंत अनेक प्रमुख राजकीय व्यक्ती अपेक्षित पाहुण्यांच्या यादीत आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन यांसारखी लोकप्रिय हॉलिवूड नावे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
-
वृत्तानुसार, प्रसिद्ध पीटर डायमँडिस, जेफ कून्स आणि लोकप्रिय सेल्फ-डिफेन्स प्रशिक्षक जय शेट्टी हे अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपैकी आहेत.
-
या विवाह सोहळ्याला केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, त्यांचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
-
या व्यतिरिक्त जॉन केरी, माजी यूके पीएम टोनी ब्लेअर आणि बोरिस जॉन्सन, इटालियन माजी पंतप्रधान मॅटेओ रेन्झी यांसारखे अनेक आंतरराष्ट्रीय मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
-
मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशीद, टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन, ऑस्ट्रियाचे माजी पंतप्रधान सेबॅस्टियन कुर्झ, कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर आणि स्वीडिशचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ड यांनाही लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
-
१० जुलै रोजी अँटिलिया येथे शिवशक्ती पूजेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात रणवीर सिंग, जान्हवी कपूर आणि इतर बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अमित त्रिवेदी यांनी कार्यक्रमात सादरीकरण केले.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शुभ विवाह १२ जुलै २०२४ रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होत आहे. त्यानंतर शुभ आशीर्वाद सोहळा होईल. त्यानंतर १४ जुलै २०२४ रोजी सर्व सोहळ्यांचा समारोप भव्य स्वागत समारंभाने होईल.
Anant Ambani, Radhika Merchant Wedding: अनंत राधिकाच्या लग्नाला ‘या’ बड्या सेलिब्रिटींची उपस्थिती? पाहा संपूर्ण यादी
Anant Radhika Wedding: अनंत राधिकाच्या लग्न सोहळ्यासाठी जगभरातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी भारतात आले होते. या यादीत कोणाकोणाचा समावेश आहे जाणून घ्या.
Web Title: Anant radhika wedding latest update guest list wedding invitation mukesh ambani famous celebrities sc ieghd import pvp