Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is indian origin kamala harris education family biography husband father mother and sister spl

PHOTOS : भारतीय वंशाच्या कमला हॅरिस कोण आहेत? त्यांचं शिक्षण किती? नावावर आहेत अनेक विक्रम, वाचा माहिती

Who is Indian-origin Kamala Harris, Kamala Harris Education, Kamala Harris Family, Kamala Harris Biography, Kamala Harris Husband: भारतीय वंशाच्या कमला हॅरिस आगामी निवडणुकीत जो बिडेन यांच्या जागी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. कमला हॅरिस उच्चशिक्षित आहेत. तसेच त्यांनी अनेक विक्रमही केले आहेत.

Updated: July 22, 2024 17:53 IST
Follow Us
  • Joe Biden
    1/9

    अमेरिकेच्या राजकारणात नवे वळण पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या जागी त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. कमला हॅरिस या निवडणुकीत विजयी झाल्या, तर जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाची महिला होण्याची ही पहिलीच वेळ असेल. (@Kamala Harris/FB)

  • 2/9

    भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या उच्चशिक्षित आहेत. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. (@Kamala Harris/FB)

  • 3/9

    अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचे पूर्ण नाव कमला देवी हॅरिस आहे. त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, कमला हॅरिस यांनी सुरुवातीचे शिक्षण कॅनडातून केले. कमला यांच्या आईला मॅकग्रा युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसरची नोकरी मिळाली, त्यामुळे त्यांना काही वर्षांसाठी दोन्ही मुलांसह कॅनडाला शिफ्ट व्हावे लागले होते. (@Kamala Harris/FB)

  • 4/9

    ओकलँड, कॅलिफोर्निया येथे जन्मलेल्या कमला हॅरिस यांनी हॉवर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, हेस्टिंग्ज कॉलेज ऑफ लॉ येथे कायद्याचे शिक्षण घेतले. (@Kamala Harris/FB)

  • 5/9

    कमला हॅरिस या सध्या अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या कृष्णवर्णीय उपराष्ट्रपती आहेत. तिला फिमेल ओबामा म्हणूनही ओळखले जाते. (@Kamala Harris/FB)

  • 6/9

    अमेरिकेच्या पहिल्या महिला, पहिल्या भारतीय वंशाच्या, पहिल्या कृष्णवर्णीय उपराष्ट्रपती असल्याचा इतिहास कमला हॅरिस यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. (@Kamala Harris/FB)

  • 7/9

    कमला हॅरिस याही पहिल्यांदा सिनेटच्या सदस्य झाल्या. यासोबतच सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट ॲटर्नी बनणाऱ्या त्या पहिल्या महिला, पहिल्या भारतीय आणि पहिल्या आफ्रिकन अमेरिकन आहेत. कमला हॅरिस या सिनेटच्या तीन आशियाई अमेरिकन सदस्यांपैकी एक आहेत. (@Kamala Harris/FB)

  • 8/9

    कमला देवी हॅरिस यांच्या आई श्यामला गोपालन या भारतातील तामिळनाडू येथील रहिवासी होत्या, त्या एक प्रसिद्ध कर्करोग शास्त्रज्ञ होत्या. त्याच्या आईने डोनाल्ड जे. हॅरिसशी लग्न केले. कमाला ५-७ वर्षांच्या असताना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर कमला आणि त्यांची धाकटी बहीण माया यांचे पालनपोषण त्यांची आई श्यामला गोपालन यांनी केले. (@Kamala Harris/FB)

  • 9/9

    कमला हॅरिस यांनी २०१४ मध्ये सुप्रसिद्ध वकील डग्लस क्रेग एमहॉफशी लग्न केले, ते ज्यू आहेत. कमला हॅरिस या एमहॉफ यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. दरम्यान, कमला हॅरिस यांची बहीण माया या व्यवसायाने वकील आणि MSNBC राजकीय विश्लेषक आहेत. (@Kamala Harris/FB)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Who is indian origin kamala harris education family biography husband father mother and sister spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.