-
हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या हवाल्याने वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जुलै २०२४ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीत असे म्हटले आहे की जगातील सर्वाधिक अब्जाधीश या १० शहरांमध्ये राहतात. यामध्ये भारतातील दोन शहरांच्या नावांचाही समावेश आहे. ही १० शहरे कोणती आहेत ते जाणून घेऊया ( रॉयटर्स )
-
१- पुन्हा एकदा शीर्षस्थानी अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर आहे जिथे ११९ अब्जाधीश लोक राहतात. (पेक्सेल्स)
-
२- ब्रिटनची राजधानी लंडन दुसऱ्या स्थानावर आहे. येथे ९७ अब्जाधीश लोक राहतात. (पेक्सेल्स)
-
३- भारताची मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत ९२ अब्जाधीश लोक राहतात. (इंडियन एक्सप्रेस)
-
४- चीनची राजधानी बीजिंगमध्ये ९१ अब्जाधीश राहतात. (पेक्सेल्स)
-
५- चीनचे शांघाय शहर पाचव्या स्थानावर आहे. येथे ८७ अब्जाधीश राहतात. (पेक्सेल्स)
-
६- सहाव्या स्थानावर चीनमधील शेनझेन शहर आहे जिथे ८४ अब्जाधीश राहतात. (पेक्सेल्स)
-
७- हाँगकाँगमध्ये ६५ अब्जाधीश राहतात. यासह, हे जगातील सातवे शहर आहे जिथे सर्वाधिक अब्जाधीश लोक राहतात. (पेक्सेल्स)
-
८- रशियाची राजधानी मॉस्को आठव्या क्रमांकावर आहे. येथे ५९ अब्जाधीश लोक राहतात. (पेक्सेल्स)
-
९- जगातील सर्वाधिक अब्जाधीशांच्या बाबतीत भारताची राजधानी दिल्ली नवव्या क्रमांकावर आहे. येथे ५७ अब्जाधीश लोक राहतात. (पेक्सेल्स)
-
१०- अमेरिकन शहर सॅन फ्रान्सिस्को हे जगातील दहावे शहर आहे जिथे सर्वाधिक अब्जाधीश राहतात. या शहरात ५२ अब्जाधीश लोक वास्तव्य करतात. (पेक्सेल्स)
PHOTOS : जगातील ‘या’ १० शहरांमध्ये राहतात अब्जाधीश लोक, भारतातीलही दोन शहरांचा यादीत समावेश, वाचा माहिती
world 10 Cities Number of billionaires, India Billionaire Cities: जगातील त्या १० शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे, जिथे सर्वाधिक अब्जाधीश लोक राहतात. यामध्ये भारतातील दोन शहरांचाही समावेश आहे.
Web Title: 10 cities of the world where most billionaires live how many billionaires are in india spl