-
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला. यासह त्यांनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही केला आहे. त्यांच्याआधी हा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर होता, त्यांनी देशाचा १० वेळा अर्थसंकल्प सादर केला होता, मात्र सातत्याने अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम निर्मला सीतारमण यांच्या नावावर आहे. अशा परिस्थितीत कोणत्या देशाने पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला आणि तो कधी मांडला भारतात पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला, याबद्दल आपण जाणून घेऊ (पीटीआय)
-
बजेट हा शब्द कुठून आला?
बजेट हा एक इंग्रजी शब्द आहे जो लॅटिन शब्द “बुल्गा” वरून प्रेरित आहे.याचा अर्थ म्हणजे चामड्याची पिशवी. फ्रेंच शब्द bulga पासून bouguet हा शब्द निर्माण झाला. जो नंतर boguet बनला, जो कालांतराने (Budget) बनला. यामुळेच अर्थसंकल्प नेहमी चामड्याच्या पिशवीत आणून सादर केला जातो. -
अर्थसंकल्प कोणत्या देशात सुरू झाला?
पहिला अर्थसंकल्प ब्रिटनमध्ये सुरू झाला. १७६० च्या सुरुवातीस राजकोषाच्या कुलपतीने प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रीय अर्थसंकल्प तेथील संसदेत सादर करण्यास सुरुवात केली. (पीटीआय) -
भारताचा पहिला अर्थसंकल्प
भारतातील पहिला अर्थसंकल्प ब्रिटिश काळात 7 एप्रिल १८६० रोजी सादर करण्यात आला. भारतातील ब्रिटिश सरकारमधील अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. (पीटीआय) -
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला?
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प १९४७ (26 नोव्हेंबर) मध्ये तत्कालीन अर्थमंत्री आरके शतमुखम चेट्टी यांनी सादर केला होता, जो कोणत्याही कर प्रस्तावाशिवाय होता. त्या कालावधीत एकूण अर्थसंकल्पीय महसूल १७१.१५ कोटी रुपये इतका अंदाजित होता. त्याच वेळी, वित्तीय तूट २६.२४ कोटी रुपये होती. वर्षभरासाठी एकूण खर्च अंदाजे १९७.२९ कोटी रुपये होता. (पीटीआय) -
देशातील सर्वात लहान बजेट
देशातील सर्वात लहान अर्थसंकल्प १९७७ मध्ये अर्थमंत्री हिरुभाई मुळजीभाई पटेल यांनी सादर केला होता, जो केवळ ८०० शब्दांचा होता. (पीटीआय) -
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे, त्यांनी एकूण १० वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. (इंडियन एक्सप्रेस) -
यापूर्वी अर्थसंकल्प केवळ याच भाषेत सादर केला जात होता
सन १९५५ पर्यंत अर्थसंकल्प इंग्रजीतूनच सादर केला जात होता. यानंतर काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पाचे पेपर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत छापण्याचा निर्णय घेतला. (इंडियन एक्सप्रेस) -
जेव्हा ९२ वर्षांची परंपरा खंडित झाली
२०१७ पर्यंत सामान्य अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केले गेले. यानंतर ९२ वर्षांची परंपरा मोडीत काढत मोदी सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र सादर करण्याचा निर्णय घेतला. (पीटीआय) -
देशाच्या तीन पंतप्रधानांनीही अर्थसंकल्प सादर केला आहे
स्वातंत्र्यानंतर, भारताचा सामान्य अर्थसंकल्प नेहमीच अर्थमंत्र्यांकडून सरकारमध्ये सादर केला जात असे. पण असे तीन प्रसंग आले जेव्हा अर्थमंत्र्यांऐवजी देशाच्या पंतप्रधानांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केले. पदावर असताना अर्थसंकल्प सादर करणारे जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांच्याशिवाय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही पंतप्रधान म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता. (इंडियन एक्सप्रेस)
PHOTOS : बजेट सादर करण्याची सुरुवात कोणत्या देशाने केली? पहिल्यांदा भारतात कधी मांडला गेला अर्थसंकल्प, वाचा माहिती
Budget 2024 Which country presented the first budget, budget, When budget introduced in India, Budget interesting Facts: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. पण कोणत्या देशाने पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला? तर भारतात अर्थसंकल्प सादर करण्यास कधी सुरूवात झाली? याच्याशी संबंधित काही गोष्टी आपण जाणून घेऊयात.
Web Title: Which country presented the first budget when was it introduced in india know 9 interesting things related to it spl