-
ऑप्टीकल इल्यूजन हा आपल्या मेंदूला आव्हान देण्याचा उत्तम मार्ग आहे.अशी चित्रे केवळ आपल्या पाहण्याच्या क्षमतेचीच चाचणी करत नाहीत तर आपल्या विचार आणि समजून घेण्याच्या प्रक्रियेलाही आव्हान देतात. अलीकडे इंटरनेटवर काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत, ज्यांनी लोकांचे मन विचलित केले आहे. या चित्रांमध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या शोधणे लोकांना खूप कठीण जात आहे. बघूया तुम्हाला ही चित्रामधील हे कोडं सोडवता येतंय की नाही?
-
१. वनस्पती, पाने आणि दगडांनी वेढलेल्या तलावाच्या या चित्रात तुम्हाला एक फुलपाखरू शोधायचे आहे. हे फुलपाखरू शोधण्यासाठी तुमच्याकडे ६ सेकंद आहेत. फुलपाखरू शोधण्यासाठी तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल.
-
२. या चित्रात एक पुरुष आणि एक महिला बोटीत बसलेले दिसत आहेत. या फोटोत बोटीजवळ पाणी, झुडपे आणि टेकड्या दिसत आहेत. पण या फोटोंमध्ये असे काही चेहरे लपले आहेत जे तुम्हाला शोधावे लागतील. त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला ९ सेकंद दिले आहेत.
-
३. या या चित्रात एक खोली दिसत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती उभा आहे. या व्यक्तीचा श्वान हरवला आहे. पण, या व्यक्तीचा कुत्रा या खोलीतच कुठेतरी लपला आहे. तुम्ही त्या व्यक्तीचा कुत्रा शोधू शकता का?
-
४. पहिल्याच नजरेत, हे चित्र एक साधे नैसर्गिक दृश्य असल्यासारखे वाटते, ज्यामध्ये टेकड्या, झाडे, वनस्पती आणि फुले आहेत. पण, या चित्रात अनेक प्राणी आणि पक्षी आहेत जे तुम्हाला शोधायचे आहेत. तुम्ही हे आव्हान सोडवू शकता की नाही ते पाहूया.
-
उत्तर १
-
उत्तर – २
-
उत्तर-३
-
उत्तर – ४
(Photo Source: Google Free Images)
Optical Illusion: चला बघूया! ‘या’ चार चित्रांमधील कोडी सोडवण्यात किती घेताय वेळ? मेंदूवर जरा द्या जोर आणि लावा उत्तरांचा शोध
Optical Illusion: अशी छायाचित्रे आपल्या निरीक्षण आणि विचार करण्याच्या क्षमतेला आव्हान देतात. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या छायाचित्रांमध्ये दडलेले चेहरे, प्राणी आणि वस्तू शोधणे कठीण आहे.
Web Title: Optical illusion find hidden things animals and objects in this puzzle dvr